उद्घघाटनाच्या तयारीला वेग; अबालवृद्धांना उत्सुकता

संतोष जाधव

नवी मुंबई-नेरुळ येथील वंडर्स पार्क नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे.सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेले आकर्षक राईड्स कारंजे तसेच लेझर शो ची व्यवस्था करण्यात आली असताना मागील अनेक दिवसापासून उद्घाटनासाठी तारीख पे तारीख असे चित्र असे चित्र पाहायला मिळत होती. अखेर मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी वंडर्स पार्कचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. पार्कचे मेकओव्हर पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनासाठी दिरंगाई होत असल्याने सातत्याने लोकसत्ताने याबाबत पाठपुरावा केला होता.

Fire in BJP Office
मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट
Navneet Ranas campaign office destroyed due to gusty winds
वादळवारं सुटलं गो… सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
Hospital Ajit Pawar wakad
पिंपरी-चिंचवड: अजित पवारांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन! फुटपाथवर असलेल्या कार्यक्रमाला पालिकेची परवानगी नाही

स्थानिक लोकप्रतिनिधी माजी सभागृह नेते रवींद्र इथापे शनिवारी सायंकाळी समाजमाध्यांयमावर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता आमदार गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे यांच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार असल्याची पोस्ट पाठवण्यात आली होती. .त्यात आयुक्तांचाही प्रमुख अतिथी असा फोटोंसह उल्लेख करण्यात आला होता.त्यामुळे वंडर्स पार्क उद्घाटनावरून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये वादंग सुरू होणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.परंतू अखेर वंडर्स पार्कच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : पाच मजली इमारतीवर तोडक कारवाई 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या तरी उद्घाटन होत नाही व पावसाळ्यात खेळण्याच्या राईड्स बंद करण्यात येत असल्याने लवकरात लवकर उद्घाटन होण्याची आवश्यकता होती.करोनाकाळापासून जवळजवळ ३ वर्षापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे पार्क बंद होते. त्यामुळे हे पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता शाळांना सुट्टी असलेल्या बच्चेकंपनीसह पालकांना होती.१ मे महाराष्ट्र दिनालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता . पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव ,खेळण्यासाठी असलेली प्रशस्त जागा , त्यातच नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित,ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा ,तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिवे लावणे अशी जवळजवळ २७ कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे पूर्णतः मेकओव्हर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वानाच या पार्कची उत्सुकता होती. आज मुख्यमंत्री तसेच मान्यवर तसेच अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती स्थानिक नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनीही दिली असून सुरक्षेबाबत प्रत्यक्ष पाहणी सुरु असल्याची माहिती दिली.

हेही वाचा >>>एपीएमसीत कोथिंबीर वधारली; घाऊकमध्ये प्रतिजुडी २५ ते ३० रुपयांवर

नवी मुंबईतील नागरीकांचे आकर्षण असलेल्या नेरुळ येथील वंडर्स पार्कचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात येणार आहे. –संजय देसाई ,शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका