नवी मुंबई : सट्टा बाजारात खरेदी विक्री करून कमी वेळात मोठा परतावा मिळून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३३ लाख ५ हजार २३ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच तात्काळ कारवाई केल्याने दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांपैकी इंडसइंड बँकेचा एक आजी तर दुसरा माजी अधिकारी आहे.

प्रवीणकुमार रमेश मिश्रा, आणि अशोक श्यामलाल चौहान अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही इंडसइंड बँकेचे अधिकारी आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी प्रवीणकुमार याने काम सोडले होते. मात्र एकत्र काम करताना त्यांची ओळख झाली होती. या दोघांनी मिळून सट्टा बाजारात पैसे गुंतवा आणि कमी वेळात भरघोस परतावा मिळावा अशी जाहिरात समाज माध्यमात केली होती. याला बळी पडून एका डॉक्टरने त्यांच्याकडे काही गुंतवणूक केली. त्याला चांगला परतवा सुद्धा मिळाला. त्यामुळे मोठी रक्कम गुंतवण्याचे फिर्यादीने सुरू केले.

हेही वाचा >>> कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

२ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान त्यांनी तब्बल ३३ लाख ०५ हजार ०२३ रुपयांची गुंतवणूक केली, मात्र परतावा मिळाला नाहीच शेवटी फसगत होत आहे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला होता. गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुढे तांत्रिक तपासात आरोपींनी मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक माहितीच्या आधारे फसवणुकी करिता वापरलेले बँक खाते तयार करणारा इसम माजी प्रविणकुमार रमेश मिश्रा, हा असल्याचे समोर आले. तो उल्लासनगर येथे असल्याचे कळताच त्याला तेथून ताब्यात घेऊन  त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी ता सदर गुन्हा अशोक श्यामलाल चौहान याच्या मदतीने केला असल्याचे समोर आले. अशोक हा इंडसइंड बँकेत बिझनेस डेव्हलपमेंट व्यवस्थापन या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे मिश्रा याने दिलेल्या माहितीवरून त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी प्रवीणकुमार मिश्रा हा उल्हासनगर येथील इंडसइंड बँक आरोपी अशोक चौहान याचे सोबत नोकरीस होता.

हेही वाचा >>> उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

आरोपी प्रविणकुमार हा चालु खाते उघडण्याकरता ग्राहक अशोक याचेकडे घेवुन येत असे व अशोक सदर ग्राहकाचे चालू खाते उघडून त्याचे डेबिट कार्ड, एम.टी.एम, चेकबुक व बँकेशी संलग्न मोबाईल क्रमांक व सिमकार्ड स्वत:कडे ठेवुन घेत होता, सदर चालू खाते कार्यान्वित झाले नंतर तो त्याचे पुढील साथीदाराला खाते देऊन सदर खात्याचा वापर सायबर फसवणूक करित असल्याचे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींना अटक केल्यावर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक आरोपींच्या कडून ४ मोबाइल फोन, ८ सिमकार्ड, ७ डेबिट कार्ड, ५ धनादेश पुस्तिका ६ रबरी स्टॅम्प आढळून आले तसेच आरोपी हे सायबर फसवणुकीकरिता वापरणारे बँक खाते हाताळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीचा महाराष्ट्रातील तसेच देशाच्या विविध राज्यांतील असे एकुण ४ सायबर तक्रारींमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.