प्रकल्पांची सद्य:स्थिती अहवाल शासनाला सादर करणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : सिडकोचे विमानतळ, मेुट्रो, रेल्वेसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती बुधवारी राज्याच्या सार्वजनिक उप्रकम समितीने घेतली. आमदार डॉ. अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वाशी येथील एका खासगी हॉटेलमध्ये सिडकोच्या या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्षात भेट दिली.

सिडकोचे सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे सिडकोची आर्थिक स्थिती देखील खालावली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी शासन मदतीची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने राज्यातील काही प्रकल्पांना आर्थिक मदत केली आहे. या समितीतील दहा आमदारांपैकी केवळ चार आमदार उपस्थित होते.

मुंबई विमानतळाला पर्याय ठरू शकेल असा दोन ग्रीनफिल्ड धावपट्टी विमानतळ प्रकल्प सिडको उभारत आहे. हा प्रकल्प राज्याबरोबरच देशासाठी महत्त्वाचा आहे. याचबरोबर सिडको बेलापूर ते पेंदार हा मेट्रो प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. सिडकोचा महागृहनिर्मिती प्रकल्प राज्यात चर्चेचा विषय असून एकाच वेळी २४ हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पाच्या कंत्राटदारांना १९ हजार कोटी रुपये अदा केले गेल्याने सिडकोची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात भूखंड विक्री केली जात असून तिजोरी भरण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने समृद्धी तसेच वाशी खाडी पुलाला आर्थिक मदत केली असून कोविड काळात चार कोविड केंद्रे उभारली आहेत. या सर्व प्रकल्पांची माहिती उपक्रम समिती अध्यक्ष डॉ. पवार याच्या अध्यक्षतेखील आमदार श्रीकांत खाडे, महेश बालदी, माधुरी मिसाळ हे उपस्थित होते. या बैठकीला स्थानिक आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर हे उपस्थित राहिले नाहीत. सिडकोच्या सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची सद्य:स्थिती अहवाल ही समिती राज्य शासनाला सादर करणार आहे. राज्य शासनाच्या या समितीने सिडको मुख्यालयात बैठक न घेता एका खासगी हॉटेलमध्ये घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडकोने मुख्यालयातील सभागृहात या बैठकीची व्यवस्था केली होती. समितीत एकूण असलेल्या दहा आमदारांपैकी चार आमदार उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection airport project government committee ysh
First published on: 18-11-2021 at 00:25 IST