पनवेल: मागील अनेक महिन्यांपासून उत्तरप्रदेश पोलीस ३३ गुन्हे ज्या व्यक्तीच्या नावावर आहेत अशा गॅंगस्टार गुन्हेगाराचा शोध घेत होते. या गुन्हेगारासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. पनवेलमधील एका गावात संबंधित गुन्हेगार राहतो असे पोलीसांना समजले. उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स आणि पनवेल शहर पोलीसांनी संयुक्त कारवाई करुन या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला. या गुन्हेगाराला त्याच्या घरातून पकडले देखील. मात्र त्यानंतर हाती आलेली माहिती धक्कादायक होती. नेमका या गुन्हेगाराचा आणि ओला, उबेर कंपनीच्या मोटारीतील सूरक्षित प्रवासाचा धागादोरा पोलीसांच्या हाती लागला.

नवी मुंबई पोलीस विभागाचे परिमंडळ दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनूसार उत्तर प्रदेश पोलीसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे उपअधिक्षक शैलेंद्र सिंग, पोलीस अधिकारी अमित श्रीवास्तव, ज्ञानेंद्र सिंह,शहजाद खॉ, हवालदार दिलीप कश्यप, शिपाई रविशंकर सिंह यांचे पथक मागील अनेक दिवसांपासून २२ वर्षीय गुन्हेगार हारिस उर्फ छोटू अब्दुल अजिज याचा शोध घेत होते. १८ वर्षाचा असल्यापासून हारिस गुन्हेगारीकडे वळाला. मागील चार वर्षात त्याने ३३ गुन्हे केले. त्यामधून महिलांच्या कानातून कानातले ओढण्यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तीन मोक्का (गॅगस्टर अ‍ॅक्ट), दुहेरी खूनासह दरोड्याचा गंभीर गुन्हा आणि इतर दरोड्याचे गुन्हे असा सराईत गुन्हेगार जो समाजासाठी धोकादायक आहे अशा गुन्हेगाराने लपण्यासाठी मुंबई गाठली.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव

हेही वाचा… अखेर २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन

मागील चार महिन्यांपासून तो लपण्यासाठी पनवेल येथील आकुर्ली गावात आपल्या काकाकडे राहत होता. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितिन ठाकरे यांच्यासमोर उत्तरप्रदेश पोलीसांच्या पथकाने या गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रस्ताव ठेवल्यावर संयुक्त कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश पवार, विनोद लबडे, हवालदार नितिन वाघमारे, अविनाश गंथडे, यशवंत झाजम, पोलीस नाईक अशोक राठोड, माधव शेवाळे, मिथुन भोसले, संतोष दाहिजे व इतर कर्मचारी उत्तरप्रदेश पोलीसांसोबत हारिसची शोधाशोध सूरु केली. अखेर पोलीसांच्या प्रयत्नांना यश आले. दोन महिन्यांपासून हारिस नवी मुंबई ओला व उबेर या कंपनीकडे चालकाचे काम करत होता. हारिस याच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेले वाहन तो चालवित होता. या वाहनाची नोंद ओला व उबेर या दोन्ही कंपनीत केली असल्याने तो प्रवासी भाड्याची ही मोटार चालवित होता. विशेष म्हणजे ओला व उबेर कंपनीने चालकांचे पोलीसांकडून चारीत्र्य पडताळणीच्या प्रमाणपत्रासोबत दररोज म्हणजे २४ तासांमध्ये एकदा तरी चालकाला सेल्फी कंपनीच्या कार्यालयाकडे ऑनलाईनपद्धतीने नोंदवावा लागतो. हिरास याला पोलीसांनी अटक केल्यानंतर त्याने भावाच्या नावावर असलेल्या नोंदीवर स्वताचे छायाचित्र पाठवून भावाच्या नावाची नोंदणी करत होता.

हेही वाचा… नवी मुंबई महापालिका अभियंता स्वप्निल देसाई यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व स्तरांतून अभिनंदन, नक्की कारण काय?

नवी मुंबई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी हे प्रकरण गंभीर असून संबंधित प्रकरणामुळे ओला व उबेर कंपनीच्या प्रवासी वाहतूकीमधील सुरक्षितेतकडे लक्ष वेधले आहे. ओला व उबेर कंपनीमध्ये प्रवासी सुरक्षित प्रवास म्हणून पाहतात. मोठ्या संख्येने बालक, विद्यार्थीनी आणि महिला या कंपनीच्या सूरक्षित प्रवासामुळे एकट्याने प्रवास करतात. मात्र या घटनेमुळे ओला व उबेर कंपनीच्या अंतर्गत चालकांची ओळखपरेडसाठी वापरात असलेली यांत्रिक तपासणीची पद्धत आणि कंपनीतील अधिका-यांचा हलगर्जीपणाची सखोल चौकशी केली जाईल असे पोलीस उपायुक्त डहाणे यांनी सांगीतले.