उरण : जेएनपीए प्रशासनाने बंदर क्षेत्रातील क्षमता वाढविण्यासाठी इंडियन पोर्ट असोसिएशनच्या सहकार्याने इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला असून या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील सर्व प्रमुख बंदरांतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय बंदर क्षेत्रातील क्षमता बांधणी आणि प्रसार करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून जेएनपीए च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. टी. के. रामचंद्रन, (भा.प्र.से.), सचिव, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय; श्री संदीप गुप्ता, संयुक्त सचिव (पीएचआरडी), बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय; श्री विकास नरवाल, व्यवस्थापकीय संचालक, आयपीए; श्री उन्मेष शरद वाघ, (भा.रा.से.), जेएनपीएचे अध्यक्ष तसेच व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक; जेएनपीएतील विभागप्रमुख आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) इंडियन पोर्ट असोसिएशनच्या सहकार्याने इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला असून या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील सर्व प्रमुख बंदरांमधून सहभागी अधिकारी रोजी उपस्थित होते. हा उपक्रम भारतीय बंदर क्षेत्रातील क्षमता बांधणी आणि प्रसार करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून जेएनपीएची वाढती भूमिका प्रतिबिंबित करतो.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. टी. के. रामचंद्रन, (भा.प्र.से.), सचिव, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय; श्री संदीप गुप्ता, संयुक्त सचिव (पीएचआरडी), बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय; श्री विकास नरवाल, व्यवस्थापकीय संचालक, आयपीए; श्री उन्मेष शरद वाघ, (भा.रा.से.), जेएनपीएचे अध्यक्ष तसेच व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक; जेएनपीएतील विभागप्रमुख आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

हा प्रशिक्षण कार्यक्रम अधिकाऱ्यांना बंदर संचालन, प्रशासन, नियामक चौकट, आणि भविष्यासाठी तयार असलेल्या समुद्री पद्धतींची ओळख करून देण्यासाठी रचण्यात आला आहे. यामध्ये जेएनपीए विभागप्रमुख आणि उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सत्रे, संवादात्मक कार्यशाळा आणि बंदर व्यवस्थापनाच्या महत्वाच्या पैलूंवरील प्रत्यक्ष अनुभव यांचा समावेश आहे. या दोन आठवड्यांच्या प्रशिक्षण सत्रात साइट व्हिजिट, पॅनेल चर्चा आणि केस स्टडीचा समावेश आहे, ज्यामुळे शिक्षण मनोरंजक आणि रोचक होईल.

बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना, मंत्रालयाचे सचिव श्री. टी. के. रामचंद्रन, आयएएस म्हणाले, “या इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रमात भारतातील सर्व प्रमुख बंदरांमधील अधिकाऱ्यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. सागरी क्षेत्र हे आपल्या देशाच्या आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी आहे आणि भविष्यातील अधिकारी म्हणून तुमची भूमिका त्याच्या मार्गाला आकार देण्यात महत्त्वाची असेल. शिकण्याचा आणि सहकार्याचा हा प्रवास सुरू केल्याबद्दल मी तुम्हा प्रत्येकाचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल व ज्ञानाची देवाणघेवाण, कौशल्य विकास आणि आंतर-बंदर सहकार्यासाठी व्यासपीठ तयार करण्याच्या सततच्या या प्रयत्नांबद्दल मी जेएनपीएचे कौतुक करतो. यासारख्या उपक्रमांमुळे भारताच्या बंदरांमध्ये नावीन्यपूर्ण, कार्यक्षम, जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देऊ शकणारा आणि उज्वल भविष्यासाठी सज्ज असा सागरी कर्मचारी वर्ग निर्माण करण्याचा मंत्रालयाचा दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो.”

या प्रसंगी बोलताना, जेएनपीएचे अध्यक्ष तसेच व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ (भा.रा.से.) म्हणाले, “जेएनपीएमध्ये, आमचा असा विश्वास आहे की कुशल मानवी भांडवल विकसित करणे हे आधुनिक बंदर पायाभूत सुविधांच्या उभारणीइतकेच महत्त्वाचे आहे. इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे आयोजन ही ज्ञानाच्या प्रसार करण्यासाठी आमची वचनबद्धता अधोरेखित करते.

मला आशा आहे की या अभ्यासक्रमाच्या अखेरीस सहभागींना एक ज्ञानवर्धक अनुभव मिळेल.” बंदरांमधील परस्पर शिक्षणाला चालना देण्याच्या जेएनपीएच्या ट्रॅक रेकॉर्डला साजेसा हा उपक्रम आहे. २०२२ साली, जेएनपीएने सर्व प्रमुख बंदरांमधील अधिकाऱ्यांसाठी एक अभिमुखता कार्यक्रम आयोजित केला, ज्याचा उद्देश नेतृत्वाची दृष्टी आधुनिक बंदर व्यवस्थापन पद्धतींशी सुसंगत करणे हा होता. शिवाय, २०२४ साली, जेएनपीएने सर्व प्रमुख बंदरांच्या सचिवांना एका प्रगत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते, ज्यामुळे आंतर-बंदर समन्वय आणि संस्थात्मक ज्ञानाची देवाणघेवाण मजबूत झाली.हे केवळ जेएनपीएच्या स्वतःच्या बंदरात कार्यक्षमतेत उत्कृष्टता साधण्यापुरते मर्यादित नसून प्रशिक्षण, संशोधन आणि सहयोगी उपक्रमांद्वारे भारतीय बंदरांच्या सामूहिक वाढीला हातभार लावण्याच्या जेएनपीएच्या व्यापक दृष्टिकोनाचे दर्शन घडवते.