जेएनपीटी बंदर ते मुंबई दरम्यानची जलसेवा शनिवार पासून पुन्हा एकदा जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू होणार आहे. त्यामुळे उरणमधील प्रवाशांना विना अडथळा तासभरात जेएनपीटीवरून थेट दक्षिण मुंबईत पोहचता येणार आहे.

हेही वाचा- करंजा मच्छीमार बंदराच्या पुर्णत्वासाठी राज्याकडून ३५ कोटी

उरण मधून उरण(मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) व जेएनपीटी बंदर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर जलसेवा सुरू आहे. या दोन्ही जलसेवा बारमाही सुरू असतात. मात्र, पावसाळ्यात चार महिन्यासाठी यातील जेएनपीटी ते गेटवे ही सेवा जेएनपीटी ते भाऊचा धक्का अशी जलसेवा सुरू होती. ती शनिवार १ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्या ऐवजी गेट वे ऑफ इंडिया अशी सुरू करण्यात येणार आहे.