जगदीश तांडेल उरण : मंगळवारी सकाळी ८.४६ वाजता अपघातामुळे बंद झालेली  खारकोपर ते नेरुळ – बेलापूर लोकल सेवा मंगळवारी सायंकाळी ७-४२ वाजता म्हणजे तब्बल ११ तासांनी पूर्ववत सुरू झाली आहे. सकाळी  बेलापूर ते खारकोपर रेल्वे स्थानकात प्रवेश करीत असतांनाच लोकलचे डबे घसरल्याने अपघात झाला होता.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कोपरी गावातील स्मशानभूमीच्या कामाला होणार सुरुवात; संकल्प चित्र तयार करण्याचे काम सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही. त्यामुळे खारकोपर – नेरुळ ते बेलापूर या लोकलचा मार्ग मागील अकरा तासापासून बंद होता. या अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. रुळावरून घसरलेले डब्बे पुन्हा पूर्ववत करून दुरुतीचे काम पूर्ण होण्यासाठी रेल्वे विभागाला ११ तासांचा वेळ लागला. मंगळवारी सकाळी झालेल्या प बेलापूर वरून  सुटलेली लोकल उलवे नोड मधील बामण डोंगरी स्थानकावरून पुढे खारकोपर स्थानकात येत असताना काही अंतरावर असतांनाच इंजिन सह दोन डबे रुळावरून घसरले आणि  अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. मध्य रेल्वे कडून दुरुस्तीचे काम वेगाने करून ही सेवा सायंकाळी ७.४२ वाजता नेरुळ ते खारकोपर लोकल सुरू करण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.