उरण : कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या उरण व पनवेल तालुक्यांच्या सीमा परिसरातील दिघाटी – चिरनेर या दोन्ही गावांतील जंगलात बिबट्याचा बिबट्याच्या पायाचे ठसे येथील नागरिकांना रविवारी आढळले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वी ही उरण परिसरात बिबटयाचा वावर असल्याचे वन विभागाने म्हटले होते. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी येथील नागरिक या जंगल परिसरातून ये जा करीत असल्याने भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तपासणी व पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी, रहिवाशांनी केली आहे. पनवेल – उरण या तालुक्याला डोंगर परिसरानी वेढले आहे. या तालुक्यातील कर्नाळा किल्ल्या लगत पक्षी अभयारण्य असून यापूर्वी अनेक वेळा या परिसरातील जंगलात बिबट्या आढळून आलेला आहे.

हेही वाचा >>>दुचाकीवरून घसरून पडलेल्या युवकाला मदत करणाऱ्या पोलिसालाच कारने उडवले, चालकावर गुन्हा दाखल 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात निजकच्या दिघाटी चिरनेर गाव परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे.या जंगलात इतर वन प्राण्या प्रमाणे बिबट्याचा ही वावर असण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी, रहिवाशांनी घाबरून न जाता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. दिघाटी जंगलात रहिवाशांच्या म्हणण्यानुसार बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. तरी शेतकरी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन कर्नाळा विभाग वन अधिकारी हेमंत करादे यांनी केले आहे.