scorecardresearch

Premium

बोकडवीरा-शेवा उड्डाणपूलावर दिवसाही दिवे सुरूच

द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या बोकडविरा व शेवा या गावांना जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वीजेचे दिवे मंगळवारी दुपारी दिवसाही सुरू होते.

lights on the Bokadvira-Sheva flyover
चारचाकी व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : येथील द्रोणागिरी नोडला जोडणाऱ्या बोकडविरा व शेवा या गावांना जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील वीजेचे दिवे मंगळवारी दुपारी दिवसाही सुरू होते. याच पुलावर अनेकदा वारंवार ये जा करणारी वीज आणि अंधार याचा सामना या पुलावरून चारचाकी व दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. तर पुलावरील खड्डे व विजेच्या लपंडावामुळे अपघातांची ही शक्यता वाढली आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Potholes on Navghar flyover danger of accidents due to darkness
उरण : नवघर उड्डाणपुलावर खड्डे, अंधारामुळे अपघातांचा धोका
Shivneri Bus, Route Altered, ganesh khind, pune, Construction, Pune Metro and Flyover, thane, mumbai
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शिवनेरी बस वाहतूक पर्यायी मार्गाने
Ganesh utsav mumbai
यंदा गणेशोत्सवात चार दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर, वर्षभरातील १३ दिवसांची यादी जाहीर
water supply remains closed in some part of pune on thursday
पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

आणखी वाचा-अवैधरित्या भारतात प्रवेश करून राहत होते दाम्पत्य, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई…

उरण मध्ये विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोडला जोडणारे रेल्वे उड्डाणपूल सिडकोकडून उभारण्यात आले आहेत. या पुलाची दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र याकडे सिडको विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे. उरण- नेरूळ रेल्वेच्या मार्गावरील हा उड्डाणपूल असून उरण शहरात ये जा करण्यासाठी असलेला. बोकडविरा ते उरण चारफाटा हा मार्ग नेरूळ ते उरण रेल्वे मार्गामुळे बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बोकडविरा ते नवीन शेवा असा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lights on the bokadvira sheva flyover remain on even during the day mrj

First published on: 05-12-2023 at 15:07 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×