उरण : सोमवार पासून उरणच्या रानसई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ११६ फूट उंचीच्या धरणात मे महिन्यात अवघे ९० फुटांवर पाणी होते. पावसाने ही पातळी गुरुवारी ९६.६ वर आणली आहे. मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडून करण्यात आलेली मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांची पाणीकपात कायम आहे. त्यामुळे या पावसाने येथील नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.

उन्हाळ्यात रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला होता. धरणात जूनअखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे. रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्याने उरणच्या नागरिकांवर पाणीकपातीचे संकट वाढू लागले आहे. रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली असल्याने धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्याचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराना दररोज ४१ दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसी कडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज १० दश लक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणी पुरवठा जून महिन्या पर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी पाणीकपात केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रानसई धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र एमआयडीसीकडून सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा विचार सुरू आहे. मात्र पावसाचा अंदाज पाहून या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.ग्यानदेव सोनवणे, अभियंता, उरण एमआयडीसी