उरण : मोरा बंदरातील गाळामुळे ओहटीच्या काळात बुधवारी २३ सप्टेंबर ला दुपारी ५.३० ते ८.४५ दरम्यान तर २४ ला ६ ते ८.३० आणि २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८.३० वाजता ही सेवा बंद राहणार आहे. शनिवारीपासून ही जलसेवा सुरळीत होणार आहे.

मोरा मुंबई जलमार्गावरील प्रवासी आणि बोट मालकांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतर ३ कोटी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात आला आहे. यामुळे ओहटीमुळे या मार्गावरील प्रवासी बोटी गाळात रुतल्याने प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत होती. या मार्गाने वर्षाला तीन लाखा पेक्षा अधिक प्रवास प्रवासी प्रवास करीत आहेत. या कामामुळे गेल्या अनेक वर्षे उरण-भाऊचा धक्का गाळात रुतलेली प्रवासी जलसेवा सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मोरा बंदरात मागील अनेक वर्षांपासून गाळाची समस्या आहे. बंदरातील गाळाच्या कायमच्या समस्येमुळे समुद्राच्या ओहोटीमुळे ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येते.कधीकधी चार-पाच दिवस प्रवासी वाहतूकच बंदच ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तर कधी कधी नवख्या सारंग-ड्रायव्हरमुळे लाँचेस गाळात रुतून बसतात.यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रवासी संतप्त होतात. दोन वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून मोरा बंदरातील गाळ काढण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरायचे अद्यापही थांबलेले नाही. त्यामुळे मोरा बंदरातील साचत असलेल्या गाळाची समस्या कायम स्वरुपी दूर करण्यासाठी प्रवासी, मुंबई जलवाहतूक संस्था, लॉन्च मालकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.

मोरा ते भाऊचा धक्का मुंबई गाळात रुतलेली प्रवासी लाँचसेवा सुरळीत होणार आहे. मोरा मुंबई जलमार्गावरील प्रवासी आणि बोट मालकांच्या सातत्याने केलेल्या मागणीनंतर ३ कोटी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे ओहटीमुळे या मार्गावरील प्रवासी बोटी गाळात रुतल्याने प्रवाशांना पाच पाच तासांची प्रतीक्षा करावी लागत होती. हा गाळ काढण्याचे काम सुरू झाल्याने वर्षाला या मार्गाने तीन लाखा पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार होता. या कामामुळे गेल्या अनेक वर्षे उरण-भाऊचा धक्का गाळात रुतलेली प्रवासी जलसेवा सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मोरा बंदरात मागील अनेक वर्षांपासून गाळाची समस्या आहे.बंदरातील गाळाच्या कायमच्या समस्येमुळे समुद्राच्या ओहोटीमुळे ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येते. कधीकधी चार-पाच दिवस प्रवासी वाहतूकच बंदच ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तर कधी कधी नवख्या सारंग-ड्रायव्हरमुळे लाँचेस गाळात रुतून बसतात.यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रवासी संतप्त होतात.

दोन वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून मोरा बंदरातील गाळ काढण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरायचे अद्यापही थांबलेले नाही.
त्यामुळे मोरा बंदरातील साचत असलेल्या गाळाची समस्या कायम स्वरुपी दूर करण्यासाठी प्रवासी, मुंबई जलवाहतूक संस्था, लॉन्च मालकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. अखेर बंदर विभागाने संबंधितांकडून केलेल्या मागणीची दखल घेतली आहे. तीन दिवसांपासून मोरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.

तर गाळाची समस्या दूर झाल्यानंतर या सागरी मार्गावरुन वर्षभर प्रवास करणाऱ्या सुमारे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया मुंबई जलवाहतूक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.