ओहोटीमुळे शुक्रवारी मोरा ते मुंबई या जलसेवेत अडथळा निर्माण होणार असून मुंबई (भाऊचा धक्का)वरून सुटणारी लाँच दुपारी २.४५ वाजल्या पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर मोरा येथून सुटणारी दुपारी ३.४५ वाजल्या पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही लाँच सेवा बंद रहाणार आहे. त्यानंतर मुंबई वरून शेवटची लाँच ८.१५ वाजेपर्यंत मोरा येथून सोडण्यात येणार आहे. याचा फटका मोरा मुंबई जलसेवा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. ही सेवा साधारणतः रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असते.

मात्र ओहोटीमुळे तासभर आधीच ही सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना चार तासांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मोरा बंदरात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून समुद्राला येणाऱ्या ओहटीमुळे पाणी कमी झाल्याने प्रवासी बोटी किनाऱ्याला लागत नाहीत. बोटी या गाळात रुतण्याची शक्यता असल्याने या कालावधीत लाँच सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : ऐरोली येथील जैवविविधता केंद्रात बोटिंग सफर सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधीच तासाला असलेल्या सेवेत चार तासांचा विलंब झाल्याने या मार्गाने उरण आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून लाखो रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढला जात असूनही मोरा मुंबई जलप्रवासातील प्रवाशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.