नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पाणी टंचाईबाबत विविध विभागांत पालिकेच्या आवश्यकतेनुसार पाणीकपात केली जात होती. परंतु मोरबे धरण काठोकाठ भरल्याने आता ही पाणीकपातही होणार नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणीकपातीला सामेरे जावे लागणार नसल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू नये यासाठी नवी मुंबई महापालिकेने गेली दोन वर्षे आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा कपात करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे शहरात काही भागांत आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा होत नसे. वाशी विभागात दर गुरुवारी संध्याकाळी पाणी येत नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर ते दिघा या ८ विभागांत आवश्यकतेनुसार पाणीकपात केली जात होती. सर्वच विभागामत आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या वतीने आवश्यकतेनुसार फिरती पाणी कपात केली जात होती. परंतप आता मोरबे धरण १०० टक्के भरल्यामुळे कोणत्याच विभागात पाणीकपात होणार नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

मोरबे धरणात यंदा सुरवातीसापूनच चांगला पाऊस पडत होता. परंतू मध्यंतरी १५ दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पुन्हा फिरत्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतप पावसाने मागील १५ दिवसामत दमदार हजेरी लावल्याने मोरबे धरण १०० टक्के भरले. त्यामुळे आता सर्वच विभागात सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

नवी मुंबई शहरात यंदा पाणीपुरवठ्याबाबतचे नियोजन करण्यात आले होते. परंतू पाणीकपात सुरप करण्यात आली नव्हती. पाणीपुरवठा नियोजनासाठी आवश्यकतेनुसार काही भागात कमी दाबाने पाणी येत असेल परंतप पाणीकपात निश्चित करण्यात आली नव्हती. आता धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पाणीकपात करण्याचा व रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. – अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, मोरबे प्रकल्प

वाशी विभागात दर गुरुवारी संध्याकाळी पाणी येत नव्हते. मोरबे धरण भरल्यामुळे आता आमची पाणीकपातीतून सुटका होणार आहे. -वैभव गायकवाड, माजी नगरसेवक

मोरबे धरणाची पाणीस्थिती

एकूण पाऊस- २९७८.६० मिमी

धरणाची पाणी पातळी- ८८.०४ मीटर

धरणातील पाणीसाठा – १००.२० टक्के टक्के