नवी मुंबई : आईलाच मारहाण करत जीवंत जळणयात आल्याची घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतही आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात ही घटना घडली असून कामधंदा कर म्हणून तगादा लावणाऱ्या आईचा गळा आवळून तिला ठार तिच्याच मुलाने केले आहे. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 

२५ ऑक्टोबरला रायगड जिल्ह्यातील रेवदंडाजवळील नवखार गावात चांगुणा नामदेव खोत या महिलेस तिचाच मुलगा  जयेश खोत याने आई जेवण देत नाही म्हणून  तिला मारहाण केली जाळून टाकले. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील कोपरी येथेही आईची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील आरोपी रूपचांद रहेमान शेख याला अटक करण्यात आली आहे. 

आणखी वाचा-नवी मुंबई : …आणि क्षणात ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपरी गावातील गावदेवी मंदिराजवळील  सागर भोईर इमारतीत आरोपी हा आई समवेत राहतो.आरोपी हा कुठलाही कामधंदा करीत नसल्याने त्याचे आणि त्याची  सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख यांच्यात कायम वादावादी होत होती. रविवारी रात्री हि अशीच वादावादी सुरु असताना  १.२० च्या सुमारास रूपचाँद शेख व आई यांचेमध्ये कामावर जाण्याचे कारणावरून भांडण झाले त्या भांडणाच्या रागातून रूपचाँद याने घरातील गमजाने ( मोठा रुमाल) आईचा गळा दाबून तिला जिवे ठार मारले. याबबत  बाबत माहिती मिळताच जवळच्याच इमारतीत राहणारी आरोपीची बहिण घरी आली. तिनेच दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.