लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या ठोक मानधनावरील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पगारवाढीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते.

अनेक वर्षापासून महापालिकेत शिक्षक म्हणून काम करत असताना वारंवार वेतनवाढीची मागणी करुनही पालिका प्रशासनाकडून आश्वासन दिले जात होते. ठोक मानधनावरील शिक्षकांनी २५ जुलैलाही मानधनवाढीसाठी आंदोलन केले होते. परंतु पालिका प्रशासनाने माध्यमिक शिक्षकांना २५०० रुपये, प्राथमिक शिक्षकांना २००० रुपये, बालवाडी शिक्षकांना १५०० व बालवाडी मदतनीस यांना १२०० रुपये मानधनवाढ केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… नवी मुंबई : विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

या तुटपंज्या मानधनवाढी विरोधात ठोक मानधनावरील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असून आमच्या तोंडाला पाने पुसली असल्याची भावना व्यक्त करत गणपती सुट्टीनंतर पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा विचार असून प्रशासनाने दिलेली तुटपुंजी पगारवाढ स्वीकारणार नसल्याची माहिती ठोक मानधन शिक्षकांचे प्रतिनिधी कृष्णा राठोड यांनी लोकसत्ताला दिली.