मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारात ‘जे’ विंग मध्ये “अक्षर एग्री कमोडिटीज” तर्फे आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “नमो सेल” नावाने सवलतीच्या दरात डाळ्याची विक्री ठेवली आहे. या ठिकाणी जवळपास १२० प्रकारच्या डाळींवर किलोमागे १ ते २ रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. मूगडाळ ८२ रुपयांवरून ८० रुपये, तूरडाळ ९२ रुपयांवरून ९० रुपये, मसूर ७२ रुपयांवरून ते ७१ रुपये, उडीद डाळ ८५ रुपयांवरून ८३ रुपये तर चणाडाळ ५५ रुपयांवरून ५३ रुपये विकली जात आहे. अक्षर एग्री कमोडिटीच्या वतीने जवळपास ३ लाख ५० हजार किलो कडधान्य विकण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती कमलेश ठक्कर यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> सिडकोच्या उरण मधील प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कसाठी संमतीने जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही विविध प्रकारच्या डाळी बाजारातील दरापेक्षा १ ते २ रुपयांनी कमी विकण्याचा संकल्प करून सवलतीच्या दराने ग्राहकांना डाळी देतो. – कमलेश ठक्कर, व्यापारी, धान्य बाजार