बाजारात स्ट्रॉबेरी म्हटले की महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई ही ठिकाणे प्रचलित आहे. या तीन ठिकाणाहून मोठया प्रमाणात एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दाखल होत असते. महाबळेश्वरमधून जास्त प्रमाणात स्ट्रॉबेरीची आवक होते. परंतु मागील काही वर्षांपासून नाशिक मध्ये ही स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात येत असून दिवसेंदिवस येथील उत्पादन वाढत आहे. एपीएमसी बाजारात ही आवक वाढत आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी प्रेमींना आता महाबळेश्वरबरोबर नाशिकचा पर्यायी ही उपलब्ध झाला आहे.

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होते. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई हे थंड हवेचे ठिकाण असून याठिकाणी नेहमीच थंड वातावरण असते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. परंतु या तीन ठिकाणाबरोबरच नाशिक मध्ये ही थंडीचे वातावरण पहावयास मिळत असून त्याठिकाणी पारा घसरत असतो.

हेही वाचा: नवी मुंबई: भिशीच्या पैशातून व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल

नाशिक मध्ये कडाक्याची थंडी पहावयास मिळते. या ठिकाणी सुरुवातीला स्टोबेरीचे थोडे उत्पादन घेतले जात होते परंतु वर्षानुवर्षे नाशिक चांगले उत्पादन निघत असल्यामुळे लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारात देखील महाबळेश्वर , पाचगणी बरोबरच नाशिक येथील आवक वाढत आहे .

हेही वाचा: नवी मुंबईत १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर उद्यानात बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण ४ ते ५ हजार क्रेट स्ट्रॉबेरी दाखल झाली असून यामध्ये ३हजार क्रेट महाबळेश्वर येथील तर दीड ते दोन पनेट नाशिक मधून दाखल होत आहेत. ऐका पनेट मध्ये ८ बॉक्स असून १५०-२००रुपयांना एक पनेट विक्री होत आहे, तर बाजारात महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीला प्रतिकिलो २४०-४८० रुपये बाजारभाव आहेत.