गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी देशातील सर्व व्यापाऱ्यांना बुडवले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलचे जनजागर आंदोलन सुरू असून आज (शनिवारी) नवी मुंबईत पार पडले. या आंदोलनानंतर विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत राज्यपासून केंद्रापर्यंतच्या सर्व भाजप नेत्यांवर हल्लाबोल करीत महागाई आणि बेरोजगारी वरील लक्ष हटवण्यासाठी अनावश्यक विषय घेत असल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी दीड फुटी आमदाराची जीभ तीन फुट झाली. ते अजित पवारांवर टिका करायला लागले असे भाष्य करीत नाव न घेता नितेश राणे यांच्यावर टिका केली. उर्फी, सिनेमातील अंगप्रदर्शन, गाणी, गाण्यावेळी घातलेल्या ड्रेसचे रंग अशा विषय काढून महागाई वरील जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. असाही त्यांनी आरोप केला. यावेळी त्यांनी तुषार भोसले आणि संभाजी भिडे याचे मुळ नाव वेगळे आहे. मुळ नाव बदलून घेत लोकांची फसवेगिरी करत असल्याचा आरोप केला. तसेच ईडी माध्यमातून आम्हा सगळ्यांना जेल मध्ये टाका. पण वाढलेली महागाई दुर करा असे आवाहन केले.

हेही वाचा >>> “जादूटोणा करणे बंद करा, अन्यथा…”, राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

जादू टोणा

देशात साडेतीन शक्ती पीठांपैकी तुळजापूरची भवानी , कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी असताना कामाख्या देवीचे घेत आगोरी विद्या करून तुम्ही खुर्ची मिळवली पण ती जास्त दिवस चालणार नाही. अघोरी विद्या, जादूटोणा असलेल्या कामाक्या देवीला एकनाथ शिंदे जातात. असा घणाघाती आरोप चव्हाण यांनी केला. आमचे दोनच उद्देश महागाई आणि बेरोजगारी यावर नियंत्रण मिळवा असे आवाहन चव्हाण यांनी केले. गॅस चा दर ४०० रूपये झाला पाहिजे. खायचे तेल ८० रूपये करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा >>> महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणे पडले महागात; गुन्हा दाखल

ठळक मुद्दे

  • चित्रा वाघांनी उर्फीच्या मागे लागण्या पेक्षा तिने महागाई कधी कमी होणार यावर बोलावे. महागाईमुळे सर्वात मोठा सर्वसामान्यांवर अत्याचार आहे.
  • केंद्र सरकारने सेंन्सर बोर्डाला आदेश देत विचित्र कपडे घालू नये असा नियम आणा, अश्लील सिनेमा, गाणी यावर बंदी आणा.
  • उर्फी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता चव्हाण यांनी कोण अमृता मी त्यांना ओळखत नाही असे सांगून विषय झटकला.
  • गुजरातने महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल सारखे देशभक्त दिले मात्र तेथील दोन व्यापाऱ्यांच्या हाती सत्ता गेली आणि देशातील सगळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले.
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nationalist congress women vidya chavan attacked on nitesh rane navi mumbai news ysh
First published on: 07-01-2023 at 20:47 IST