उरण : जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते करळ दरम्यानच्या मार्गावर शनिवारी कंटेनर वाहनाचा अपघात झाला आहे. या मार्गावरील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयांमुळे हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाही. मात्र कंटेनर वाहनातून वाहून नेण्यात येणारे वजनी समान कळंडल्याने अपघात होण्याची शक्यता होती.

हेही वाचा : मुंबई गोवा महामार्गाच्या गतीने होणाऱ्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाविषयी मनसेकडून साशंकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरण सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांची सूचना देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत वाहन आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केली आहे. तर बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात चालणारी कंटेनर वाहने ही वेग मर्यादा, वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने अनेकदा अशा प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व लहान वाहनांना धोका निर्माण झाला आहे.