नवी मुंबई : घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांनी कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करून महानगरपालिकेकडे प्रक्रियेसाठी द्यावे याबाबत नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने आग्रही असून त्यादृष्टीने व्यापक जनजागृती करण्यात येेते. त्याच अनुषंगाने ई-कचरा अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा वेगळा संकलित करण्याकडेही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी रविवारी (ता.१८) ई कचरा संकलन उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ई कचरा संकलनासाठी महानगरपालिकेमार्फत वेगळे वेळापत्रक बनविण्यात आले असून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई आणि थ्रेको कंपनी यांच्या सहकार्याने, ई-वेस्ट रिसायकलिंग मोहीम हा अभिनव उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. बहुतांशी नवी मुंबईकर नागरिकांनाही दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ई-कचरा संकलित करण्यात येतो याची माहिती झाली असून आपल्या घराजवळून ई-कचरा संकलित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

दारापर्यंत सेवा

ई-वेस्ट संकलनासाठी महानगरपालिकेच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून जारी करण्यात आलेल्या क्यू आर कोडव्दारे अथवा https://docs.google.com/forms/d/1-qBd5HS-OA5Bp4413z6H-R2X0_bccQyVGP87c1Tyz4k/edit?chromeless=1 या गुगल लिंकमधील फॉर्मवर आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व आपल्याकडील ई-कचऱ्याची माहिती नोदविल्यास आपल्याकडील ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावर अगदी दरवाजापर्यंत वाहन येऊन ई-वेस्ट संकलित केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता व पर्यावरणप्रेमी जबाबदार, सोसायट्या, विविध संस्था, औद्योगिक संस्था व संघटना यांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि नवी मुंबईच्या स्वच्छता व पर्यावरणशीलतेसाठी अमूल्य योगदान द्यावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.