नवी मुंबई – नवी मुंबई शहरात गुरुवारी संध्याकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली होती. शहरात रात्रभर पाऊस पडत असून सर्वाधिक पाऊस बेलापूर नेरूळ युगात पडला आहे तर संपूर्ण शहरात सरासरी ५७.२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. शहरात विविध भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुढील तीन ते चार तास मुंबई, नवी मुंबई व परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबई शहरात पहाटेपासूनच पावसाला सुरवात झाली होती. त्यात बेलापूर ते वाशी विभागात पावसाचे प्रमाण अधिक आहे.तर कोपरखैरणे ,ऐरोली, दिघा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
बेलापूर,नेरुळ,वाशी,कोपरखैरणे,ऐरोलीसह विविध उपनगरात पावसाने हजेरी लावली असून काळ्या ढगांनी आकाश आच्छादलेले पाहायला मिळत आहे. शहरात सर्वाधिक पावसांची नोंद बेलापूर विभागात झाली असून सर्वात कमी पाऊस कोपरखैरणे विभागात झाला आहे. शहरात वाऱ्यामुळे १ झाड कोसळण्याची घटना घडली असल्याची माहिती पालिका आप्तकालिन व्यवस्थापन विभागाने लोकसत्ताला दिली. तर दुसरीकडे नवी मुंबईला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात जोरदार पाऊस झाला असून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत मोरबे धरणात मागील २४ तासात ८३ .८० मिमी पावसाची नोंद झाली असून धरण ७१ टक्के भरलेले आहे.
शहरातील पाऊस… पाऊस
- बेलापूर – ९३ मिमी
- नेरुळ – ७४ मिमी
- वाशी – ४६.६० मिमी.
- कोपरखैरणे – ३९.९० मिमी
- ऐरोली – ४५.२० मिमी
- दिघ- ४५ मिमी..
- मोरबेत ८३.८९ मिमी पाऊस पडला आहे.