उरण : बर्फाच्या दरवाढीने बर्फ विक्रेते आणि मच्छिमारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र चर्चेनंतर या दरवाढीत चर्चेअंती तोडगा निघाला असून टना मागे ८५ ऐवजी ६५ रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांना दरवाढीत २० रुपयांचा दिलासा मिळाला आहे. प्रदिर्घ चर्चेनंतर बर्फाच्या प्रति टनामागे ८५ रुपये वाढीचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला.बर्फाची प्रति टनामागे करण्यात आलेली ही दरवाढ एक ऑक्टोबरपासून लागु करण्यात येणार आहे.तसेच येत्या एक जुनपर्यंत तरी कोणत्याही कारणाने दरवाढ न करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली आहे.

ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर अखेर मच्छीमारांना पुरवठा करण्यात येत असलेल्या बर्फाच्या प्रतिटनात ६५ रुपये दरवाढीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.ही दरवाढ एक ऑक्टोबरपासून लागु करण्यात येणार आहे.बर्फ पुरवठा बंद करण्याच्या मागे घेण्याच्या निर्णयामुळे हजारो मच्छीमार, व बर्फ वितरकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

एक ऑगस्टपासून सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधीच मच्छीमारांसाठी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात टनामागे ८० रुपयांची वाढ केली होती.त्यानंतर दिड महिन्यातच वीज दरवाढीचे कारण पुढे करीत ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे पुन्हा आणखी प्रतिटन ८५ रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती.बर्फाच्या दरवाढीवर मंगळवारी (१६ सप्टेंबर) झालेल्या बैठकीत दरवाढीला मच्छीमार संस्थांनी विरोध केला होता.

मात्र ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनने विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींनी केलेला विरोध झुगारून २० सप्टेंबर पर्यंत बर्फाच्या दरवाढीचा प्रस्ताव मान्य न केल्यास मच्छीमार संस्था व बोटींचा बर्फ पुरवठा बंद करण्याचा इशारा असोसिएशनने बैठकीतच दिला होता.मात्र या दरम्यान दरवाढीचा निर्णय घेण्याचा फेरविचार करण्याची मागणी करतानाच या मासळी व्यवसायावर अवलंबून असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर दोन दिवसात पुन्हा तातडीने बैठक बोलाविण्याची विनंती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केली होती.

या विनंतीवरून शुक्रवारी (१९) ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली.वाशी येथील मर्चट जिमखाना येथे आयोजित बैठकीत ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष रसिक देसाई अन्य पदाधिकारी तसेच करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रमेश नाखवा, चंद्रकांत कोळी, नारायण नाखवा,अमोल रोगे, बर्फ सप्लायर्स आणि विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत बर्फाच्या दरवाढीवर घमासान चर्चा झाली.ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन बर्फाच्या दरात ८५ रुपये वाढ करण्याच्या प्रस्तावावर ठाम होती.अखेर दोन्ही बाजूच्या प्रदिर्घ चर्चेनंतर बर्फाच्या प्रति टनामागे ८५ रुपये वाढीचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला.बर्फाची प्रति टनामागे करण्यात आलेली ही दरवाढ एक ऑक्टोबरपासून लागु करण्यात येणार आहे.तसेच येत्या एक जुनपर्यंत तरी कोणत्याही कारणाने दरवाढ न करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली. बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे हजारो मच्छीमार,ऑल इंडिया आईस मॅन्युफॅक्चर असोसिएशन व बर्फ वितरकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.