नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने नोटीस देऊनही संबंधितांनी दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात पालिका अतिक्रमण विभागामार्फत नेरुळ व घणसोली विभागांत पाडकाम कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरुळ कार्यक्षेत्राअंर्तगत असलेल्या अनधिकृत बांधकाम धारक रामचंद्र बाळाराम ठाकूर घर क्र. १०५, नेरुळ गाव या इमारतीचे पाडकाम करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस तैनात होते.

हेही वाचा >>>भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचप्रमाणे घणसोली विभाग कार्यालयामार्फत राजु सातपुते (घरमालक व विकासक) यांनी सर्व्हे नं. २०/३०,से.२२ तळवली गांव, घणसोली येथे पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. आर.सी.सी., तळमजल्यासह पहिल्या मजल्याचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या मजल्याच्या कॉलमचे काम प्रगतीपथावर असल्याचे आढळून आले.पालिकेने या अनधिकृत बांधकामावर पाडकाम कारवाई केली आहे. तसेच संबंधितांकडून ५० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. कारवाईच्या वेळी पोलीस तैनात होते.