नवी मुंबई : श्रावण महिन्यात एपीएमसीत पालेभाज्यांच्या हंगामाला सुरुवात होते. वाशीतील एपीएमसी भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचे दर कमी होते, परंतु बुधवारी बाजारात मेथीची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात मेथी दुप्पट दराने विक्री होत आहे. मंगळवारी प्रतिजुडी ६-७ रुपयांनी विकली जात होती. पंरतु आज बुधवारी बाजारात १२-१५ रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, नारळी पौर्णिमा निमित्त आगरी-कोळ्यांच्या उत्साहाला उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रावण महिन्यात पालेभाज्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे या कालावधीत पालेभाज्या महाग होतात. परंतु मंगळवारपर्यंत मेथीचे दर आवाक्यात होते. मात्र आज बुधवारी बाजारात मेथीची आवक घटली आहे. मंगळवारी एपीएमसीत १ लाख १२ हजार २०० क्विंटल आवक झाली होती. मात्र बुधवारी बाजारात आवक घटली असून ६७ हजार ५०० क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे दरात दुप्पट वाढ झाली असून आधी प्रतिजुडी ६-७ रुपयांनी उपलब्ध असलेली मेथी १२-१५रुपयांनी विक्री होत आहे.