एपीएमसी बाजारात भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले आहेत, परंतु दोन आठवड्याआधी लसणाच्या दरात वाढ झाली होती. बाजारात आता नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत लसणाच्या दरात चढउतार पहावयास मिळतील असे मत व्यापाऱ्यांतुन व्यक्त होत आहे.

हेही वाचा- शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नोव्हेंबरमध्ये फळ आणि पालेभाज्यांच्या दराने उचांक गाठला होता. परंतु आता हिरवा वाटाणा , कोबी,फ्लावर, वांगी, मिरची , पालेभाजी दर गडगडले आहेत. परंतु मागील दोन आतड्यापासून लसणाच्या दरात १० रुपयांची दरवाढ झाली आहे. एपीएमसीत लसणाच्या १३ गाड्या दाखल झाल्या असून यामध्ये एक गाडी नवीन लसूण दाखल झाला आहे. मध्यप्रदेश येथून लसणाची आवक होत असून आणखी पुढील कालावधीत नवीन लसूण आवक सुरू राहिले. साधारणतः एप्रिलपर्यंत नवीन लसणाचा हंगाम असतो. मात्र, यादरम्यान उच्चतम प्रतीच्या लसणाला मागणी अधिक असेल असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पुरवठा आणि मागणीनुसार दरात चढउतार होतील.

हेही वाचा- नवी मुंबईत अनेक ठिकाणी अस्वच्छता, सिबीडीमध्ये फडके विद्यालयाजवळील पदपथावर कचरा, प्रशासनाचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या घाऊक बाजारात हलक्या दर्जाचा लसूण प्रतिकिलो २० रु ते ८० रु तर उच्च दर्जाचा ८०रु ते १०० रु तर नवीन लसूण २०-६०रुपयांनी विक्री आहे. जानेवारी महिन्यात नवीन लसणाचा हंगाम सुरू होतो. सध्या बाजारात जुना सुकलेला लसूण दाखल होत आहे. थंडीचे वातावरण असल्याने हा लसूण खराब होण्याची शक्यता जास्त असते. येत्या दोन ते तीन महिन्यात नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात होईल.