नवी मुंबई : शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात कार्यादेश मिळाल्यानंतर २ वर्षे उलटली तरी अद्याप संपूर्ण शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर नाही. निम्मे शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविनाच राहिले आहे. आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध कामांचे पालिकेच्या पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुमचे ऑनलाईनद्वारे उद्घाटन केले. अद्याप कोपरखैरणे ते दिघा हे परिमंडळ २ मध्ये सीसीटीव्ही लागले आहेत. परंतू प्रत्यक्षात सीसीटीव्हीची कनेक्टीव्हीटी झाली नाही. तर बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे हे विभाग मात्र सीसीटीव्हीच्या कक्षेत आले आहेत.

महापालिका क्षेत्रात अद्याप १५२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यातील परिमंडळ १ मध्ये ८३६ तर परिमंडळ ६८८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आले असले तरी परिमंडळ २ मध्ये मात्र लावलेल्या ६८८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या जोडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कॅमेरे लागूनही परिमंडळ २ मधील सीसीटीव्ही फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची नजर बेलापूर ते वाशी या परिमंडळ १ भागात नववर्षाच्या स्वागतापासून झाली आहे. तर दुसरीकडे कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ २ विभागाला मात्र सीसीटीव्हीची अद्याप प्रतीक्षाच आहे. शहरात जवळजवळ एकूण ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे.

हेही वाचा : डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

शहरात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळजवळ १५० कोटी रुपये खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून परिमंडळ १ मधील काम पूर्ण झाले आहे. परिमंडळ २ मधील कामही लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष देण्यात येईल.

डॉ. कैलास शिंदे ( आयुक्त, नवी मुंबई महापालिका)

हेही वाचा : ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिकेने शहरात सीसीटीव्ही लावले असून पोलीस विभागाला गुन्हे शोध तसेच शहरातील नागरिकांच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अधिक मदत होत आहे. संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानी खाली आले तर त्याचा अधिक फायदा होणार आहे.

पंकज डहाणे ( पोलीस उपायुक्त, परिमंडळ १ )