लोकसत्ता प्रतिनिधी,
उरण : जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावरील चिर्ले येथे शनिवारी दुपारी अवजड कंटेनर वाहनांच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील मोठीजुई गावातील ही व्यक्ती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : दुकानातील नोकर चोर असल्याचा संशय…मालकाने केली बेदम मारहाण
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
उरणला जोडणारे दोन्ही महामार्गावर कोंडी
अपघातामुळे जेएनपीटी ते पळस्पे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेक वाहने ही जेएनपीटी ते नवी मुंबई या महामार्गावरून ये जा करू लागल्याने करळ ते जासई आणि गव्हाण दरम्यानच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.