पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या मालमत्ता करदात्यांनी सहा वर्षांचा सरसकट लावलेला मालमत्ता कर भरण्यास सुरुवातीला पाठ दाखविली होती. मात्र महापालिकेने दंड व्याजाची देयके पाठविल्यानंतर आणि कर देयकांसह दंडाची वसूली मोहीम हाती घेतल्यानंतर करदात्यांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र मागील ९ महिन्यांत २२७ कोटी रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती पालिकेने गुरुवारी दिली.

हेही वाचा >>> घणसोली येथे ढिसाळ वाहतूक नियोजनाने मनस्ताप

एप्रिल महिन्यापासून ते २१ डिसेंबरपर्यंत २२७ कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली असून महापालिकेच्या स्थापनेपासून आर्थिक वर्षामधील नऊ महिन्यात जमा होणारी ही सर्वात मोठ्या रकमेची करवसुली आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी करवसूलीबाबत आदेश दिल्यानंतर उच्चतम थकबाकीदारांना त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता अटकावणी संबंधिच्या तसेच जप्तीपूर्व नोटीसा बजावल्या.

पुढील काळात जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पालिकेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालमत्ता कर न भरल्यास नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणावर बंदी येणार आहे. तसेच मालमत्ता कराचा बोजा मालमत्तेवर चढविला जाणार आहे. याचबरोबर स्थावर व जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकरात आपला मालमत्ता कर भरावा. गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका