पनवेल : पनवेल प्रशासकीय भवनाच्या जागेतील बचतधाममधील तीन गाळेधारकांनी १० वर्षांपूर्वी पनवेलच्या तहसीलदारांविरोधात दिवाणी न्यायालयात धाव घेऊन शासकीय जागेतील भाडेकरू असल्याचा दावा करून ही जागा ताब्यात राहण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा केला होता. हा दावा मागील आठवड्यात पनवेल जिल्हा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश कृ. मु. सोनावणे यांच्या सुनावणीत नामंजूर करण्याचे आदेश दिल्यामुळे पनवेलच्या प्रशासकीय भवनाच्या इमारतीचा संपूर्ण विकास करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.

जुन्या पनवेल तहसील कचेरीच्या कार्यालयालगत सुसज्ज इमारत बांधकामासाठी सर्व सरकारी कार्यालयांना स्थलांतरित केल्यानंतर तहसीलदारांनी जुन्या कचेरीलगतच्या सिटी सर्व्हे मालमत्ता क्रमांक ७०२ वरील ६३३.८ चौरस मीटरच्या क्षेत्रावर मुलकी बचतधाम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तळमजला आणि त्यावर एक मजला या इमारतीमधील गाळेधारकांना जागा स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर गाळेधारकांनी १९९९ सालच्या महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियमानुसार संबंधित जागेचा ताबा स्वत:कडे राहण्यासाठी न्यायालयात धाव घेत अलिबाग येथील कल्याणनिधीचे कुलाबा (रायगड) जिल्हा मुलकी सेवकवर्गाचे अध्यक्ष पनवेल तहसीलदारांविरोधात दावा केला होता. याच दाव्याचे प्रकरण न्यायाधीश कृ. मु. सोनावणे यांच्यासमोर सुरू होते.

Jai Bhim Nagar, huts in Jai Bhim Nagar,
मुंबई : जयभीमनगर प्रकरण; झोपड्यांवर कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
Badlapur encounter case, High Court question,
बदलापूर चकमक प्रकरण : शिंदेला लागलेली गोळी कशी सापडली नाही ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
dr ajit ranade continues as gokhale institute vc till october 7 bombay hc
डॉ. अजित रानडे हे ७ ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…

हेही वाचा – तळोजाची औद्योगिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल

पनवेलचे तहसीलदार यांच्या वतीने सरकारी वकील श्रीमती एम. आर. थळकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. बचतधामला तीन गाळे या मालमत्तेत देण्यात आले होते. मात्र शासकीय जागेतील गाळेधारकांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम लागू होत नसल्याने हा दावा नामंजूर करण्यात आल्याचे आदेश न्यायाधीश सोनावणे यांनी दिले. संबंधित प्रकरणात न्यायालयातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून निकाल मिळण्यासाठी १० वर्षे ११ महिन्यांचा कालावधी लागला.

भवनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात असून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या एकत्रित तारखा मिळत नसल्याने या भवनाचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलला जात असल्याची चर्चा आहे. सध्या या इमारतीमधील पूर्वाश्रमीची सरकारी कार्यालये इतर भाड्याच्या जागेत सुरू आहेत.

हेही वाचा – खारघर येथील नवा पूल वाहतुकीसाठी खुला

दहा वर्षांपासून रखडपट्टी

विविध सरकारी कार्यालये एका भवनाच्या इमारतीत झाल्यास नागरिकांचे हेलपाटे वाचतील या उद्देशाने सरकारने १० वर्षांपूर्वी पनवेलचे प्रशासकीय भवन बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र वेगवेगळ्या अडचणींचा सामना करीत लाखो रुपये बांधकामावर खर्च करूनही या भवनाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.