लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : राज्यातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा आता पाच किंवा दहा वर्षांसाठी दत्तक घेता येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. परंतु या निर्णयाविरोधात रविवारी नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू राहणार आहेत. शासनाच्या शाळा दत्तक योजनेविरोधात पालक आक्रमक झाले असून रविवारी पालिका शाळा सुरू ठेवत शासनाचा निषेध करणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच पालक संघटनांकडून पालिकेला याबाबत अर्ज करण्यात येत असून पालिकेने अद्यााप याबाबत कोणताच निर्णय दिला नाही.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही ‘दत्तक योजना’ राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे देणगीदाराने सुचवलेले नाव संबंधित सरकारी शाळेस देता येणार आहे. त्यामुळे अशी योजना आली तर शहरातील पालिकेच्या शाळांना स्थानिकांची नावे दिली आहेत. त्यामुळे देणगीदाराने शाळेस नवीन नाव दिल्यास सध्याचे नाव सदर नावाच्या पूर्वी किंवा नंतर लावता येईल असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरात अनेक मान्यवरांची नावे शाळेला दिली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. परंतु सरकारच्या या योजनेवर विविध स्तरांतून तीव्र टीका होत आहे.

आणखी वाचा-पालिका शाळांच्या स्थितीची न्यायाधीशांकडून पाहणी

रविवारीही शाळा भरवण्याचा निर्णय नवी मुंबईत पालक तसेच शिक्षक संघटनांनी घेतला आहे. याबाबत शिक्षण उपायुक्त दत्तात्रय घनवट व शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता याबाबत अद्यााप कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाही असे त्यांनी सांगितले. रविवारी शाळा सुरू ठेवून अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. हजारो पालक शाळा चालवतील त्याला शिक्षकांचेही पाठबळ मिळणार आहे, असे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाच्या शाळा दत्तक योजनेमुळे महापालिकेत शाळांबरोबरच शिक्षकांचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही पालकांसमवेत असून शासनाच्या चुकीच्या निर्णयाविरोधात शाळेत उपस्थित राहणार आहोत. -कमलेश इंगळे, शिक्षक, नवी मुंबई महापालिका