Premium

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

नवी मुंबईतील बिझनेस हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी नोड मध्ये बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्या आहेत.

traffic jam Mumbai Nashik highway
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई: नवी मुंबईतील बिझनेस हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी नोड मध्ये बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात १ ३ हजार २१ वाहन चालकांवर कारवाई करीत तब्बल २० लाखांची दंड वसुली केली गेली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील वाशी येथे वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांच्यावर धडाधड कारवाई सुरु केल्या आहेत. या कारवाईत विशेष कारवाईचाही समावेश केला गेला आहे. सोमवारी दिवसभर बस थांब्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बस थांब्यावर गाडी पार्क केली असल्याने प्रवाशांना चढ उतार  करण्यासाठी बस अगदी रस्त्याच्या मध्यभागी थांबवावी लागत होती. साहजिक त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनाही ब्रेक लागत असल्याने प्रत्येक बस थांब्यावर वाहतूक कोंडी प्रमाणे परिस्थिती होत होती त्यामुळे हि विशेष मोहीम आखात कारवाई करण्यात आली . यात ३५ पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली गेली. 

हेही वाचा >>> अखेर मंगळवारी नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

तसेच मार्च पासून आज पर्यंतच्या  कालावधीत त्यांनी वाहतूक नियमनाबाबत वेगवेगळ्या मोहीम राबवून वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या हन चालकांवर एकूण 13 हजार 21 वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे.  त्यामध्ये दारू पिवून वाहन चालविणाऱ्या ८४ चालकांवर समावेश आहे. सीटबेल्ट न लावणे ८७६, हेल्मेट न घालणे २ हजार १८१,  सिग्नल तोडणे १ हजार १४८ , काळी काच लावून कार चालविणे १९४, ट्रिपल शिट १०३, या कारवाईचा त्यात समावेश आहे. या कारवाईत वाहतूक पोलिसांनी २० लाख १३ हजार ६०० रुपये  दंड वसूल केला आहे. सतीश कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाशी वाहतूक शाखा) वाहन चालकांनी नियमांचे पालन केले तर कारवाईची गरज नाही. शिवाय सर्वांना विना अडथळा विना वाहतूक कोंडी सुरळीत प्रवास शक्य आहे. मात्र तसे न केल्याने दंडात्मक कारवाई करावी लागते. वाहतूक नियमांचे पालन करावे हेच वाहन चालकांना आवाहन आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police action against break of traffic rules ysh

First published on: 30-05-2023 at 14:47 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा