नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पुढील काही दिवसांत सादर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नसलेलाच अर्थसंकल्प सादर होणार असल्याची शक्यता असून यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या १,३८४ कोटींच्या ठेवींच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ठेवींमध्ये वाढ होत या ठेवी १,५०० कोटी होणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्पहा २० तारखेपर्यंत सादर करण्यात येईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये १५६ कोटींची रस्त्यांची कामे; कळंबोली, खारघर, कामोठे, पनवेल शहर,तोंडरे येथील रस्त्यांचा समावेश

महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश नार्वेकर अर्थसंकल्प सादर करणार असून या अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर व तर शहरासाठी पायाभूत सुविधा पुरवणारे नवे प्रकल्प या अर्थसंकल्पात सादर केले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अर्थसंकल्पाबाबत पालिका आयुक्तांनी नागरिकांकडूनही अपेक्षा मागवल्या आहेत. महापालिकेला प्राप्त झालेल्या नागरिकांच्या अपेक्षा संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या आहेत.

२०२३-२४ या गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ११४५.०३ कोटी आरंभीच्या शिलकीसह ४९२४ कोटी जमा व ४९२२.५० कोटी खर्चाचे व २.५० कोटी शिलकीचा नवी मुंबई महापालिकेचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आले होते. यावर्षीही शिलकीचा अर्थंसंकल्पीय अंदाज सादर करण्यात येणार असून यावर्षीचा अर्थसंकल्प हा पाच हजार कोटींच्यावर जाणार का याची उत्सुकता आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : महापालिकेत १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

यंदा लोकसभा निवडणुकांमुळे करवाढ करणे कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारी नसल्याने यंदाचा अर्थसंकल्पही कोणतीही करवाढ नसलेलाच असण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काही ठाराविक नवे प्रकल्पवगळता गतवर्षीच्या जुन्याच अर्थसंकल्पाला नवी झळाळी मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख अनिश्चित

शहरात सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची तरतूद अशा बाबींचा अर्थसंकल्पात समावेश असेल. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले व नव्या शैक्षणिक वर्षात तरी नवे वैद्याकीय महाविद्यालयाबरोबरच आरेग्यसुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी १४, १५, २० फेब्रुवारी यापैकी एक दिवस निश्चित केला जाण्याची दाट शक्यता आहे.