उरण: गुरूवारी सकाळी ७ वाजल्या पासून उरण शहर आणि तालुक्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर अनेक दिवस गायब झालेला पाऊस गोपालकाल्याच्या दिवशी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे उशिराने का होईना पुनः एकदा पाऊस परतल्याने शेतकऱ्यांनाही समाधान व्यक्त केले आहे.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने उरण तालुक्यातील भातपिके संकटात आली आहेत. यातील पन्नास टक्के पीके नष्ट झाली आहेत. तर दुसरीकडे या काळात उन्हाचे प्रमाण वाढल्याने उष्मा वाढला होता. या वाढलेल्या तापमानामुळे तापाची साथ वाढली होती.

हेही वाचा… नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह; शहरात ५० सार्वजनिक दहीहंडीचे आयोजन,पोलिसांची चोख व्यवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरण तालुक्यात ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत आता पर्यंत सरासरी २ हजार २३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये १ हजार ७१४ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०२२ मध्ये ३६२ मात्र आता पर्यंत अवघ्या ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यावर्षी जवळपास २६९ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पावसाअभावी उरण तालुक्यातील भात शेती संकटात आली आहे.