लोकसत्ता टीम

उरण : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील करळ ते जासई उड्डाणपूल दरम्यानच्या मार्गावर गुरुवारी दिवसाढवळ्या पथदिव्यांचा लखलखाट पडला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांची अशी स्थिती अनेकदा पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रवासी व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जेएनपीटी व उरणला जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलासह अनेक ठिकाणचे पथदिवे दिवसाही सुरू असतात. तर अनेक ठिकाणचे पथदिवे रात्री बंद असतात. त्यामुळे उरण मधील या राष्ट्रीय महामार्गावर अनेक दिवसांपासून पथदिव्याच्या प्रकाशाचा दिवसा खेळ सुरू आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे.

आणखी वाचा-नेरूळ येथील श्री गणेश सोसायटी पुन्हा वादात

जेएनपीटी बंदरामुळे उरण ते नवी मुंबई व उरण ते पळस्पे असे दोन राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील प्रवास वेगवान झाला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठं मोठे उड्डाणपूल आहेत. या मार्गावरील पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील वीज पुरवठा करणारे रोहित्राच्या सुरू असलेले चोरीचे सत्र होते. यातून मार्ग काढून मार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-उरणच्या वाढत्या वायु प्रदूषणाकडे स्थानिक प्रशासनाचा कानाडोळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र जेएनपीटी ते नवी मुंबई मार्गावरील करळ ते जासई त्याचप्रमाणे जेएनपीटी ते पळस्पे मार्गावरील गव्हाण फाटा ते टी पॉईंट या परिसरातील पथदिवे दिवसाही सुरू आहेत. मात्र यातील काही भागात पथदिवे लागत नसल्याने अंधार पडत आहे. त्यामुळे उरण आणि जेएनपीटीला जोडणाऱ्या या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.