नवी मुंबईत सुमारे वीस वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सातत्यपूर्ण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा निषेध म्हणून मंगळवारी आरपीआयने आंदोलन केले यावेळी विविध विषयांना छेडत शहर अभियंता यांना हटवण्याची मागणीही करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- VIDEO: सीवूड्स रेल्वेस्थानकाजवळील गृहनिर्मिती प्रकल्पाच्या  कामाला दिवस रात्र परवानगी आहे का?

आज आरपीआय संघटनेने नवी मुंबईतील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. देशात सर्वोत्तम ठरेल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक झाले, हे स्तुत्य असले तरी  त्यांचा पुतळा उभा करण्यात येत नाही. जानेवारी २०२१ मध्ये पुतळ्याच्या जागेची पाहणी करण्यात आली. शिवाय पुतळ्यासाठी आरपीआयने तीन जागा सुचवल्या. मात्र पाहणी करण्याव्यतरिक्त कुठलीही हालचाल मनपाकडून झाली नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लावा. या मुख्य मागणीसह इतर अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

हेही वाचा- नवी मुंबई: १५ फेब्रुवारीपर्यंत शीव पनवेल मार्गावरील नेरूळ ते शिरवणे सेवा रस्ता बंद

तीन वर्षापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने विकी इंगळे या युवकाचा मृत्यू झाला होता. मात्र त्या डॉक्टरवर कुठलीही कारवाई न केल्याने विकी याचे पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. यात न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन आयुक्तांसह सहा डॉक्टरच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या सर्वांना निलंबित करण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. शहर अभियंता यांच्या भ्रष्ट कारवाई निलंबित करून चौकशी करण्यात यावी, झोपडपट्टी रहिवासी पास दिले नाहीत ते देण्यात यावे, अनेक ठिकाणी सर्वेक्षण बाकी ते पूर्ण करावे, समान काम सामान वेतन याचा अलवंब  प्रत्यक्षात करावा, आणि  फेरीवाला धोरण निश्चित करावे अशा इतर मागण्याही करण्यात आल्या आहेत. या शिवाय डॉ आंबेडकर स्मारक नियमावली तयार नाही ती लवकरात लवकर करून कार्यान्वित करावी अशीही मागणी करण्यात आली. अशी माहिती नवी मुंबई जिल्हा युवक अध्यक्ष यशपाल ओव्हाळ यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंत गायकवाड ,प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, प्रदेश अध्यक्ष मराठा आघाडी बाळासाहेब मिरजे, महिलाध्यक्ष शीला बोदडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpis agitation for the demand of erecting a statue of dr babasaheb ambedkarin navi mumbai dpj
First published on: 20-12-2022 at 17:50 IST