नवी मुंबई शहरात मलनिस्सारण पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी आद्योगिक वसाहत आणि उद्यानासाठी वापर करण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराची लोकसंख्या दुप्पट झाली तरीही ही यंत्रणा पुरेशी आहे असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : मोकळ्या भूखंडावरील राडारोडा, कचऱ्याकडे महापालिकेडून दुर्लक्षित?

नवी मुंबई शहरात मलनिस्सारण  पाण्यावर शंभर टक्के मलनिस्सारण प्रक्रिया करण्यात येत असून या पाण्याचा औद्योगिक वसाहती मधील कंपन्यांना व उद्यानांना पुरवठा करण्यात येणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अमृत योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून २५० एमएलडी पाणी या माध्यमातून औद्योगिक वसाहती आणि उद्यानांच्या कामासाठी वापरात येणार आहे. सोमवारी  मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी आमदार गणेश नाईक यांच्या सामावेल मनपा अधिकाऱ्यांनी केली.  

हेही वाचा- स्वच्छता कामगारांचा झाडू स्वयंस्फुर्तीने नवी मुंबईकरांच्या हाती..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई ही देशातील एकमेव महापालिका आहे जेथील मलनिस्सारण यंत्रणेची क्षमता एवढी मोठी आहे की सध्या आहे त्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकसंख्या झाली तरीही ही यंत्रणा पुरेशी आहे अशी प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. या केंद्रामुळे पिण्याचा पाण्याचा वापर कमी होईल अर्थात हीच पाण्याची बचत होईल. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला ही बाब फायदेशीर ठरणार आहे असा दावाही करण्यात आला.