दिपावलीच्या पहिल्या दिवशी उरणच्या द्रोणागिरी नोडमधील मॅजेस्टीक व्हीला, सेक्टर ५० येथील एम गोल्ड ज्वेलर्समध्ये एका अज्ञाताने बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला त्याच्या दोन सहकाऱ्यांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कारचा क्रमांक व फास्टग आणि मोबाईलच्या सहाय्याने पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाखांची इनोव्हा वाहन जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात २२ ऑक्टोबरला उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- परदेशी पक्षांचे स्थान असलेले पाणजे पाणथळावरील पाणी रोखले; पक्षी अभ्यासावर परिणाम होणार

या गुन्हयाचा तपास नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, डॉ. जय जाधव सह पोलीस आयुक्त, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, पनवेल, धनाजी क्षीरसागर सोा,सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि विजय पवार, सपोनि प्रकाश पवार, पोलीस उप निरीक्षक चंद्रहार पाटील, उरण पोलीस ठाणे, सहायक पोलिस निरीक्षक गळवे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम, न्हावाशेवा पोलीस ठाणे,पोलीस हवलादर रूपेश पाटील, घनश्याम पाटील, शशिकांत घरत, नितीन गायकवाड, मच्छिंद्र कोळी सचिन माळशिकारे यांनी र्कोणताही सुगावा नसताना आरोपीना घटनास्थळावर येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चित करून सदर मार्गावरील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून एम गोल्ड ज्वेलर्समध्ये जबरी चोरीच्या इराद्याने आलेल्या इसम ज्या इनोवा कारमधून पळून गेला होता त्या इनोवा कारचा क्रमांक एम एच ४३ एक्स ७०७७ असा नंबर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा- असा असेल सायन- पनवेल महामार्गावरील वाशी गावाजवळील नवा टोलनाका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वाहनाचे फास्टटॅगला संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरून गाडी मालकाची माहिती मिळवली होती. तसेच त्या दिवशी गाडी मालकाने कोणाला वाहन दिले होती याची चौकशीही पोलिसांनी केली होती. चौकशीदरम्यान इनोवा कारचालक अंकुश अश्रुबा जाधव यांना कल्याण अलिबागचे भाडे असल्याचे सांगून गाडी नेली असल्याचे माहिती पोलिसांनी मिळाली. या वाहनाच्या चालकाला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्याने आरोपी एजाज अब्दुल करीम चैधरी, रा. उल्हासनगर कॅम्प नं. 4 याचे सांगणेवरून इनोवा गाडी भाडयाने घेतली होती. या गुन्हयात अंकुश अश्रुबा जाधव,( ४४ ), संघर्ष नगर, साकीनाका, मुंबई ,बिलाल अब्दुल करीम चैधरी( १९) उल्हासनगर यांना उरण पोलिसांनी अटक केली असून ११ ऑक्टोबर पर्यंतची कोढडी सुनवण्यात आली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.