नवी मुंबई – आजमितला संतुलित आहारात ज्वारीलाही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बाजारात ज्वारीला सर्व स्तरांतून मागणी वाढत आहे. मात्र अवकाळी पडलेल्या पावसाने ज्वारीलादेखील फटका बसला असून, यंदा हंगाम १५ दिवस उशिरा सुरू झाला असून उत्पादन ३० ते ४० टक्के कमी राहील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात ज्वारी आणखी महागण्याची शक्यता आहे.

आजच्या धावपळीच्या जगात नागरिकांनी आपला मोर्चा व्यायामकडे वळविला आहे. त्याचबरोबर बहुतांशी नागरिक संतुलित आहारालादेखील तेवढेच महत्त्व देत आहेत. आहार तज्ज्ञांकडून संतुलित आहार घेण्यास सांगण्यात येते, त्यामुळे गहू, तांदूळ त्याचबरोबर ज्वारी, बाजरी यांनादेखील महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गृहिणीदेखील ज्वारीला अधिक पसंती देत आहेत. मात्र अवकाळी पावसाने ज्वारीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे यंदा बाजारात ज्वारीची आवक ३० ते ४० टक्के कमी होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच वर्षभरात ज्वारीचे दोन हंगामात पीक घेतले जाते. यामध्ये पिकांची योग्य मशागत न केल्याने दिवसेंदिवस ज्वारीचा दर्जा खालावत असून छोटे दाणा असणारी ज्वारी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. बाजारात सोलापूर, करमाळा, जामखेड, बार्शी येथून ज्वारी दाखल होत असून, बुधवारी बाजारात १ हजार १० क्विंटल आवक झाली असून, ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. लातूर येथील ज्वारी प्रतिकिलो ३७-३८ रुपये तर बार्शी, करमाळा, जामखेड येथील ज्वारी ४०-४२, तर सोलापूर येथील उच्चतम प्रतीची ज्वारी ५५-६० रुपये दराने विक्री होत आहे. घाऊक बाजारात ज्वारीचे दर २०१७-१८ या वर्षात २३ रुपये सरासरी होते, ते २०१८-१९ मध्ये २७ रुपये किलो सरासरी झाले. त्यानंतर दर आणखी वाढले असून, आता प्रतिकिलो पन्नाशी पार केली आहे. आगामी कालावधीत दर साठी पार करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांविरोधात गुन्हा दाखल करा; नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – नवी मुंबई: कर्जदारांना तात्काळ थकीत व्याज परतावा द्या; समता सहकारी सामाजिक संस्थेची मागणी

अवकाळी पावसामुळे यंदा १५ दिवस उशिराने हंगाम सुरू झाला असून, यंदा ३० ते ४० टक्के उत्पादन कमी असणार आहे. परिणामी दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे अन्नधान्य बाजार समितीचे संचालक निलेश वीरा म्हणाले.