लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : उरणकरांची लोकलची प्रतीक्षा आता काही दिवसांवर आली असून बुधवारी दुपारी पुन्हा एकदा लोकलची चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे या मार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभागाची लगबग सुरू झाली आहे. या लोकलला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखविणार आहेत. या तयारीने उरणकर सुखावले असून उरणकरांचे अनेक वर्षांचे लोकलचे स्वप्न साकार होणार आहे.

१२ जानेवारी रोजी उलवा नोडमधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित अटलसेतू व इतर अनेक विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृशप्रणालीद्वारे उरण ते खारकोपर लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. उरण ते खारकोपर या लोकलच्या मार्गावरील गव्हाण वगळता उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा, रांजणपाडा ही स्थानके तयार आहेत. तेथील काही कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण केली जात आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबई ठरले देशातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर

स्थानिक गावांच्या नामकरणाचा प्रश्न

या मार्गावरील स्थानकांची नावे येथील गावांच्या नावाने करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी आंदोलनही केले असून रेल्वेमंत्र्यांचीही भेट घेतली आहे. यामध्ये उरण (कोट), द्रोणागिरी (बोकडवीरा), न्हावा शेवा (नवघर), रांजणपाडा (धुतुम), गव्हाण (जासई) अशी मागणी आहे. नामकरण न झाल्यास उद्घाटनाच्या वेळी विरोध करण्याची भूमिका जाहीर करण्यात आली आहे.

उरण-खारकोपर मार्गाच्या उद्घाटनाच्या तयारीची कामे सुरू असून ती पूर्ण केली जात आहेत. -पी. डी. पाटील, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Test of uran kharkopar local on today mrj
First published on: 11-01-2024 at 14:45 IST