स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे आयोजित कचरावेचक भगिनी-संवाद सभेत कोपरखैरणे येथे बोलताना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहराला स्वच्छ करण्याचे श्रेय कचरावेचक भगिनींना जाते, असे म्हटले. “ज्या ठिकाणी कचरा गाडी जाण्याची यंत्रणा नाही तिथे जाऊन या महिला प्रामाणिकपणे काम करतात, हे मी माझ्या स्वच्छता पाहणी दौऱ्यात पाहिले आहे. सध्या ज्या पाच ठिकाणी ‘स्लम मॉडेल’ म्हणून हे काम सुरू आहे. त्यामध्ये वाढ करून अजून चार ठिकाणी हे काम सुरू करण्यात येईल, असे नार्वेकर म्हणाले.

कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून सध्या दोन ठिकाणी ट्रान्सफर सेंटर उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून या महिलांना सुका कचरा चांगला मिळेल त्यातूनच नवी मुंबई स्वच्छ व कचरा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. कचरा वेचक भगिनीचा मुलगा आयएएसचे प्रशिक्षण घेत आहे. याचा उल्लेख करून पाच वर्षांनी तो माझ्या ठिकाणी उभा असेल ही मला अत्यंत समाधानाची बाब असेल. नवी मुंबई स्वच्छ करणे एवढे मर्यादित हेतू नसून यातून या महिलांच्या व्यथा दूर करून त्यांचे उत्पन्न कसे वाढेल, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण कसे मिळेल तसेच ते सर्वांच्या भल्यासाठीच आहे, असा उदात्त मानवतावादी विचार नार्वेकर यांनी मांडला.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा

हेही वाचा – उरणमध्ये बरसल्या अवेळी सरी; दोन मिनिटांच्या सरींनी नागरिकांची तारांबळ

हेही वाचा – नवी मुंबई : १ महिन्यात ७० टक्के परताव्याचे आमिष; ५ लाखांचा फटका

वृषाली मगदूम यांनी आपल्या प्रास्ताविकात कचरावेचक महिलांना महापालिका प्रशासन व इतर संस्थांच्या माध्यमातून जी मदत झाली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कचऱ्यात काम करत असताना महिलांना येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती मापसेकर यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कचरावेचकांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख करून त्या धर्तीवर सुरू असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कामाबद्दल प्रशंसोद्गार काढले. राधाकृष्णन यांनी आज कचरा वेचत असणाऱ्या भगिनींची पुढील पिढी याच कामात येऊ नये या उद्देशाने त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी योगदान त्यांच्या ट्रस्टतर्फे केले जात आहे, असे सांगितले.