पनवेल: एका महिन्यापासून १९ वर्षीय विद्यार्थीनी कळंबोलीतून बेपत्ता होती. अखेर मंगळवारी तीचा मृतदेह खारघरमध्ये निर्जनस्थळी सापडला. नवी मुंबई पोलीसांनी तीच्या हत्येचा तपास पुर्ण केल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तीच्या प्रियकरानेच तीचा खून केल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे. तसेच या गंभीर तपासात पोलीसांनी वैष्णवीचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर केल्याचे समोर आले.

कळंबोलीत राहणारी वैष्णवी बाबर ही १२ डिसेंबरपासून महाविद्यालयात जाते सांगून घरातून बाहेर पडली ती घरी परतलीच नाही. वैष्णवी ही मुंबई (सायन) एसआयएस या महाविद्यालयात शिकत होती. वैष्णवी ज्या दिवसापासून बेपत्ता झाली त्याच दिवशी कळंबोली वसाहतीमधील २६ वर्षीय वैभव बुरुंगले हा बेपत्ता झाला होता. वैभव हा वैष्णवीचा प्रियकर होता अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. १२ डिसेंबरला वैभव याचा मृतदेह जुईनगर रेल्वेरुळावर सायंकाळी पाच वाजता सापडला.  अनेक दिवस वैष्णवी सापडत नसल्याने विशेष तपास पथक स्थापन करुन या प्रकऱणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे पोलीस आयुक्तांनी सोपविला होता. मरणापूर्वी वैभव याने मोबाईलमध्ये खून केल्याचे आणि आत्महत्या केल्याचे सांकेतिक भाषेत लिहून ठेवले होते.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
faculty and non-teaching staff have not been paid since two months in Department of Higher Education in West Vidarbha
प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतनच नाही; तब्बल साडेपाच हजारांवर…

हेही वाचा >>>आंदोलनातील हुतात्म्यांचा भूमिपुत्रांनाच विसर

पोलीसांच्या पथकाने या सांकेतिक शब्दाचा उलगडा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांचे पथक वैष्णवीचा शोध घेत होते. खारघरच्या डोंगररांगांमध्ये वैष्णवीचा शोध पोलीसांसोबत लोणावळ्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीम, सिडकोचे अग्निशमन दल, वन विभाग यांचे कर्मचा-यांनी घेतल्यावर मृतावस्थेत वैष्णवी सापडली. वैष्णवी आणि वैभवचे काही वर्षांपासून प्रेम होते. वैष्णवी हीच्या घरातून लग्नाला विरोध असल्याने वैष्णवीने विभक्त होण्याचा विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. वैष्णवी ही आपल्याला यापूढे भेटणार नाही हे समजताच वैभवने वैष्णवी हीला अखेरच्या भेटीसाठी घराबाहेर बोलावले. तीला खारघर येथे घेऊन जाऊन तीचा खून केला. त्यानंतर स्वताची जिवनयात्रा आत्महत्या करुन संपविली अशी माहिती तपास करणा-या पोलीसांना मिळाली.