पनवेल : उरण येथील कोट्यावधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील महिला आरोपी व तीच्या सहका-यांशी पोलीसांचे धागेदोरे उजेडात आले आहेत. संशयीत महिला आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीसांंच्या तपासात चिटफंड आरोपींना नवी मुंबई पोलीस दलामधील तीन पोलीस अधिका-यांनी मदत करुन त्यांच्याकडून लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली.

हेही वाचा >>> भूखंड घेताय? सावधानता बाळगा अन्यथा फसवणूक…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्तांच्या या कारवाईमुळे बुधवारी रात्री पोलीस दल हादरले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला राज्याच्या पोलीस महासंचालकांनी भेट देऊन काही तास उलटल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उरण येथील चिटफंड घोटाळ्यातील संशयीत महिला आरोपी सुप्रिया पाटील आणि तीच्या सहका-यांनी दिलेल्या कबूली जबाबावरुन तीन पोलीसांना घरी बसावे लागले. गुन्हे अन्वेषण शाखा क्रमांक २ चे पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील, पोलीस उपनिरिक्षक योगेश पाटील आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप सोनवलकर अशी कारवाई झालेल्या पोलीस अधिका-यांची नावे आहेत.