नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत विविध नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत राज्यभरात स्वच्छतेबाबत व सुभोभीकरणात आघाडीवर असते. टाकाऊतून टिकाऊ अशी अभिनव संकल्पना राबवत आकांक्षी शौचालय कोपरखैरणे, सेक्टर १४ येथे उभारण्यात आले आहे. या आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात कचऱ्याचा पुनर्वापर करून कोपरखैरणे येथे आकांक्षी शौचालय उभारताना पालिकेने ४२६ चौ.मी. क्षेत्रफळाच्या पुनर्प्रक्रियाकृत प्लास्टिक शीटचा वापर केला आहे. तसेच ५.३० मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिकचा उपयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शौचालयाची सजावट ११ हजार ७०० हून अधिक प्लास्टिक बाटल्यांच्या वापरातून केली आहे. तसेच शौचालयातील विविध सांकेतिक चिन्हे ही ३५ हजार २०० हून अधिक बाटल्यांच्या झाकणांचा अत्यंत कलात्मक पद्धतीने वापर करुन आकर्षक रूप देण्यात आले आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : बाजारात ‘गोल्डन’ सीताफळे दाखल, मागणीत वाढ, जाणून घ्या किंमत

पालिकेने शौचालयांच्या सजावटीसाठी संगणकाच्या ८५ की-बोर्डचा उपयोग केला आहे आहे. वाहनाचे प्रतिरूप साकारण्यासाठी २८४ किलो टाकाऊ लोखंडी वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणात प्रक्रियायुक्त पाण्याचा पालिका वापर करत असताना दुसरीकडे पालिकेने या आकर्षक शौचालयासमोर कारंजे उभारले आहे. हे शौचालय थ्री आर संकल्पनेचे उत्तम रूप आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : युनिटी मॉलमुळे उलवे व्यापारी केंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिकेने ७५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या शौचालय बांधकामात पुरुषांसाठी ४ शौचकुपे व १ स्नानगृह आणि ३ मुताऱ्यांची व्यवस्था केली आहे. तसेच महिलांकरीता ३ शौचकुपे व १ स्नानगृह आणि १ बेबी टॉयलेट व्यवस्था केली आहे. महिलांसाठीच्या शौचालय व्यवस्थेत बेबी केअर सुविधा तसेच सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन, इन्सिनरेटर, हॅन्ड ड्रायर अशा सुविधा आहेत. दिव्यांगासाठी स्वतंत्र शौचकुपाची व्यवस्था करण्यात आली आहे.