नवी मुंबई: नवी मुंबईतील एकमेव नैसर्गिक पर्यटन ठिकाण म्हणून गवळी देव डोंगरची ओळख आहे. मात्र या वर्षी होणाऱ्या विकासकामांच्या मुळे या ठिकाणी पर्यटकांना पावसाळी सहली करणाऱ्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून येणाऱ्यांना अचानक येथे आल्यावर प्रवेश बंद असल्याचे कळते.

पावसाळी सहलीत अति उत्साहित लोक धोका पत्करून धबधबा किंवा नदीत धरणात उतरतात. अशा पैकी अनेकणांचा जीव गेल्याची उदाहरणे दर वर्षी समोर येतात. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नवी मुंबई पनवेल परिसरातील धबधबे धरण नदी क्षेत्रात बंदी घातल्यात आली आहे. त्यात पनवेल मधील गाढी नदी, धरण , पांडवकडाच्या मानाने नवी मुंबईतील गवळी देव त्यामानाने  सुरक्षित पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले. जाते. गवळीदेव डोंगरावरील गर्द झाडी, पक्षांचा किलबिलात त्यात दोन धबधबे पाहून नवी  मुंबई सारख्या आधुनिक शहरात एवढे निसर्गरम्य प्रदेशनापासून कोसो दूर ठिकाण असेल यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. अगदी वेळप्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. कौटुंबिक सहली, मित्रांच्या सोबत असे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येतात.

या पूर्वी या ठिकाणी पर्यटकांच्या साठी काही सुखसोयी करण्यात आल्या होत्या. मात्र एक परिपूर्ण सोयींनी युक्त पर्यटन विकास करण्याचे स्वप्न नवी मुंबई कर अनेक दशकांच्या पासून पाहत आहेत तर निवडणुकीत राजकीय अजेंड्यावरही गवळी देव डोंगर विकास नमूद असते. हा परिसर नवी मुंबई एमआयडीसी भागात येत असला तरी त्यावर अधिकार वनक्षेत्राचा असल्याने विकासकामात विविध परवानग्या घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशी नेहमीकच मनपा प्रशासन पातळीवर रडगाणे सुरु असते.

गवळीदेव डोंगर परिसर पर्यटन दुर्ष्टीने विकसित करण्यासंबंधी प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया पार पडल्यावर हे काम   मे . क्लासिक इन्फ्रा. इंजीनियरिंग प्रा. लि . या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. हे काम २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ ला संपणे आवश्यक होते. याकामासाठी ३०० दिवस देण्यात आले आहेत. अशी पाटील न दिसेल अशा पद्धतीने लावण्यात आली आहे. मात्र विविध परवानगी मिळाल्या नंतर येथील काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळा असल्याने आता काम बंद असून डिसेंबर पर्यंत काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती अभियांत्रिकी विभागाने दिली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गवळीदेव डोंगरावर साज

विकासकामांच्या नुसार या डोंगरावर सर्वात महत्वाचे म्हणजे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे अश्लील चाळे, छेडछाड  अथवा उघड्यावर मद्यपान यावर पूर्ण नियंत्रण येऊ शकेल. या शिवाय चढण्या उतरण्यासाठी सहज होईल पाय घसरणार नाही अशा पायऱ्या करण्यात येणार आहेत. तसेच शौचालय, विद्युत रोषणाई, बसण्यासाठी आकर्षक बाकडे, जागेनुसार मोठ्या झाडांना पार बसवणे अशी कामे होणार आहेत. त्यामुळे या वर्षी नाही तर निदान पुढील वर्षी तरी गवळीदेव सुरक्षित आणि सुसज्ज असेल. विशेष म्हणजे या विकासकामात निसर्गाची कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती अभियांत्रिकी विभागाने दिली.