शीव पनवेल महामार्गावरील नेरुळ शिरवणे व बेलापूर येथील महामार्गावरील कॉक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहनचालकांना सातत्उयाने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असल्ड्डायाचे चित्र पाहायला मिळत होते.परंतू वाहतूक विभागाने केलेल्या विविध उपाययोजनामुळे या मार्गावरील वाहतूककोंडीमध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : वडापाव विक्री थेट विभाग कार्यालयात; मनसेचे अनोखे आंदोलन

शीव पनवेल मार्गावरीलकॉंक्रीटीकरणाचे काम सुरु झाल्याने वाहतूक कोंडी होत होती. परंतू आता यात चांगली सुधारणा झाली असून या मार्गावर अतिरिक्त वाहतूक पोलीस ठेवण्यात आले आहेत. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात मुंबईत येण्यासाठी व पार्टी करण्यासाठी मुंंबईबाहेर जाण्यासाठी अनेकजन सज्ज असल्याचे चित्र आहे. परंतू या मार्गावर वाहनचालकांना व नागरीकांना वाहतूककोंडीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने विविध उपाययोजना केल्या असून याच मार्गावर एखादी गाडी बंद पडली तरी तात्काळ गाडी काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.तर दुसरीकडे वाहतूक पोलीसांची संख्या वाढवून गर्दी टाळण्यासाठी संख्याबळ अधिक ठेवण्यात येत असून मागील काही दिवसापासून रस्त्याच्या कामामुळे तुर्भे ते खारघर पनवेल पर्यंतची वाहतूक काही प्रमाणात सुधारली आहे.

हेही वाचा- बंदरावरील उद्योगात नोकर भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांना अर्ज करण्याचे आवाहन; ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकट- शीव पनवेल महाम्रार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे हलकी वाहने कार पामबीच मार्गावरुन वळवण्यात आली आहेत.तसेच कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस ठेवण्यात आले आहेत. वाहन बंद पडल्यास तातकाळ हटवण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाले असून ३१ डिसेंबरलाही या मार्गावर चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.