मूळ उत्तरप्रदेशचे असलेले दोन मित्र नशीब आजमावण्यास मुंबईत आले. मात्र त्यांनी कष्ट करण्यापेक्षा पैसा कामावण्यास शार्टकटचा अवलंब केला. एक घरफोडी केली यशस्वी झाली आणि मग घरफोडी करणे नित्याचेच झाले. यासाठी त्यांनी पुणे नवी मुंबई आणि मुंबईत येत होते. मात्र नेरूळ पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना अटक करण्यात यश आले.  सौरभ देवशरण यादव (वय २४ वर्षे), तौफिक हावसी शेख (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई : तुर्भेत १ टनहून अधिक प्लास्टिक साठा जप्त
 
कायम पत्ता बदलणारे आरोपींनी सध्या मीरा भाईंदर येथे मुक्काम ठोकला होता. नेरूळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीचा तपास करीत असताना काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये हि दोन्ही आरोपी आले होते. त्यांचे फोटो खबऱ्यांना देण्यात आले. या प्रयत्नांना यश आले व हे दोन्ही आरोपी शिरवणे येथे असल्याचे समोर आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे घरफोडी करण्याचे साहित्य मिळुन आले आहे. त्यांना पोलिसी हिसका दखवत चौकशी केली असता नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतच त्यांनी गेल्या काही महिन्यापासून सहा घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी सांगितलेल्या घरफोडीची शहानिशा केली असता या सहाही घरफोडी बाबत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा- नवी मुंबई : स्लॅबचा भाग कोसळून बालकाचा मृत्यू

नेरूळ येथील गुन्ह्यातील  त्यांच्याकडून अंदाजे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ८ लाख रुपयांचे दागिने व .५ हजाराचा  टॅब असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर अटक आरोपी हे सराईत घरफोडी करणारे आहेत. अटक आरोपी सौरभ देवशरण यादव, वय- २४ याच्याविरूध्द घरफोडीचे याच्याविरूध्द घरफोडीचे  नवघर पोलीस ठाणे – २ , कस्तुरबा पोलीस ठाणे,-१ , कळंबोली, एपीएमसी, सीबीडी, कोपरखैरणे येथे प्रत्येकी १ गुन्हा, सानपाडा पोलीस ठाणे- ५ गुन्हे ,  सिंहगड रोड व फरासखाना पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस आयुक्तालय येथे प्रत्येकी १ गुन्हा नोंद आहे. नेरूळ पोलीस ठाणेकडे दाखल गुन्हयांचा तपास करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two inveterate burglars arrested in navi mumbai dpj
First published on: 12-12-2022 at 15:51 IST