नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीच मार्गांवर वेगावर नियंत्रण राखता न आल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सारसोळे गाव सिग्नलजवळ शनिवारी अपरात्री एकच्या सुमारास झाला आहे. या बाबत नेरुळ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
शनिवारी अपरात्री एकच्या सुमारास एक दुचाकीस्वार वाशीहून बेलापूरच्या दिशेने जात असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे तो खाली पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कूटीस्वाराने त्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे स्कूटीस्वार आणि त्याच्या मागे बसलेला व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले.
हा अपघात वाशी ते सीबीडी मार्गीकवर घडला आहे. यात नेरुळ सेक्टर २० येथे राहणारा दुचाकी चालक विशाल संजय सूर्यवंशी, (वय २८ वर्ष , धंदा नोकरी ) याने त्याच्या ताब्यातील मो स्कुटी भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या लोखंडी पाईपला धडक देऊन गंभीर जखमी झाला. तो गंभीर जखमी असून बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावर अपोलो रुग्णालय येथे आय सी यू मध्ये उपचार घेत आहेत.
हा अपघात घडला त्या नंतर काही वेळात एकाच दुचाकीवर बसून संकेत रावसाहेब गरजे, वय २५ वर्ष यश सुनील वंजारी,वय २३ प्रणव जितेंद्र गाढवे, वय २३ आले होते. त्यांना गाडीच्या वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने थांबलेल्या दुचाकीला मागून धडक दिली. मोटार सायकल चालवणारा संकेत गरजे गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायास डाव्या हातास फ्रॅक्चर झालेले आहे. व इतर दोन इसम हे किरकोळ जखमी आहेत.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि सर्व जखमींना बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमींच्या नातेवाईकांना कळवले असून ते रुग्णालयात पोहोचले होते. पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत.अशी माहिती नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी दिली.