नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून भूखंड मिळाला यात वाद नाही. मात्र, भूखंडावरून जो वाद उद्भवला आहे त्यात हिटलरशाही प्रमाणे न वागता सर्व संमतीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका उद्धव ठाकरे शिवसेनेने पत्रकार परिषदेत मांडली आहे.  

हेही वाचा- ‘सोयाबीन आणि कापसाला भाव द्या’; मंत्रालयासमोर जलसमाधी घेण्यासाठी निघालेले शेतकरी पनवेलमध्ये नजरकैदेत

नवी मुंबईत होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाला पहिल्याच घासात खडा लागला आहे. महाविद्यालयास दिलेल्या भूखंडाला  फोर्टी प्लस क्रिकेट संघटना एनसीपी आणि शिवसेना विरोध करीत असून हा वाद मिटवण्यासाठी एक समिती स्थापन करावी आणि  समिती जो निर्णय घेईल तो सर्वांनी मान्य करावा, अशी मागणी नवी मुंबई शिवसेना अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.  बेलापूर सेक्टर १५ येथील भूखंडावर २०११ पासून  फोर्टी प्लस संघाचे  क्रिकेट सामने होतात, असा दावा फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास मोकल यांनी केला. तर भूखडा साठी पैसे का द्यावे लागतात ? तो भूखंड सिडकोने मोफत द्यावा अशी भूमिका घेत  एनसीपी नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत यांनी वादात उडी घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेना नवी मुंबई अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनीही हाच मुद्दा उपस्थित करीत सर्व समावेशक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. तसेच महासभेची परवानगी घ्यावी अशीही भूमिका मांडत थेट मनपा आयुक्तांना गळ घातली होती.

हेही वाचा- उरण: ३७ कोटींचे डिझेल परतावे थकल्याने मच्छिमार आर्थिक संकटात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घडामोडीबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी सर्व समंतीने समिती स्थापन करण्याची मागणी केली. तसेच ही समिती भूखंडाबाबत जो निर्णय घेईल तो सर्वांनी मान्य करावा. आमचा वैद्यकीय महाविद्यालय वा रुग्णालयास विरोध नाहीच मुळात ही परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे, असेही मोरे म्हणाले.