उरण : आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त जेएनपीए बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून शनिवारी कामगार वसाहतीत संगम योग म्हणून योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कामगार वसाहतीत नवीन योग उद्यानाच उद्घाटन ही करण्यात आले. नरोगी समाज बनविण्याच्याचे सकारात्मक पाऊल पाऊल म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने व बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
“योग सगम” या भारतातील दसऱ्या क्रमांकाच्या सवात मोठ्या भव्य योग सत्राच आयोजन करण्यात आले होते. यावर्षी ‘एक पथ्वी, एक आरोग्य योग’ महाराष्ट्राची नोडल समन्वयक संस्था असलेल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, वरळी यांच्या समनव्यातुन या योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात लोकांनी येत हा दिन साजरा केला. यावेळी कायक्रमस्थळी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच थेट प्रक्षेपणही करण्यात आले.
निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी सर्व सहभागींना ‘योगा कीट’ प्रदान करण्यात आले. सकाळी ६ वाजता हे सत्र सुरू करण्यात आले. यावेळी जेएनपीए प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक उन्मेष शरद वाघ हेही उपस्थित होते. तसेच जवाहरलाल नेहरू बंदराचे सर्व विभागप्रमख, विश्वस्त, अधिकारी,कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ही उपिस्थत होते.
या कार्यक्रमचे सूत्र संचालन मनीषा जाधव, महाव्यवस्थापक यांनी केले. तर जनप प्राधीकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलच अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक उन्मेष शरद वाघ यांच्या हस्ते कामगार वसाहतीत १६ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील विशेष योग उद्यानाच्या ‘योग संगम’ याचे उदघाटन ही करण्यात आले. स्थानिक रहिवाशी आणि कर्मचारी यांच्या आरोग्यवर्धक सवयी वाढाव्यात यासाठी या नवीन उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे.याचा योग प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन वाघ यांनी यावेळी उपस्थितांना केले.