नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, फेरीवले,मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या दुकान धारकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु आता ही धडक कारवाई मंदावली असून शहरात ठिकठिकाणी व्यवसायिक व दुकानधारक सर्रास व्यवसाय करण्यासाठी वाढीव जागेचा वापर करीत आहेत. एपीएमसी माथाडी भवन येथील वाहनांच्या वर्दळीने तसेच नागरिकांच्या गजबजलेल्या परिसरात येथील व्यवसायिक दुकानदारकांनी आपले बस्तान थेट आता सामासिक जागेचा वापर करून पुढे फुटपाथवरही मांडले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना नाहक या गर्दीतूनच वाट काढावी लागते.

हेही वाचा- नवी मुंबई पोलीस भरती; २०४ पदांसाठी तब्बल १२ हजार ३७५ अर्ज

वाशी एपीएमसी माथाडी भवन येथील बाजार आवारात वाढीव जागेचा वापर सुरूच आहे. एकेकाळी माझे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सरसकट सर्वच ठिकाणी वाढीव जागेचा वापर करणाऱ्यांवर टाच आणली होती शहरात दुकानदारांकडून वाढदिवसाचे वापर करत असल्यास त्या ठिकाणी तत्परतेने कारवाई केली जात होती त्यामुळे त्या कालावधी दरम्यान वाढीव जागा वापर करणाऱ्यांना आळा बसला होता आणि परिस्थिती नियंत्रणात होती पंरतु आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एपीएमसी माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या आहे. या भागातील रस्ता पाचही बाजाराला जोडला गेला आहे . त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते.त्यामध्ये रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा विळखा असतो, अशातच येथील व्यापारी दुकान धारक आपला बाजार वाढीव जागेसमवेत आता फुटपाथवर ही मांडून ठेवले आहेत.

हेही वाचा- बंदरावरील उद्योगात नोकर भरतीसाठी प्रकल्पग्रस्तांना अर्ज करण्याचे आवाहन; ६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याठिकाणी विद्युत रोषणाईचे सामान, किराणा बाजार, किरकोळ बाजार, असे अनेक प्रकारचे दुकान आहेत. मात्र ही मंडळी त्यांचे सामान अधिक जागेत पसरवून ठेवून अनधिकृतपणे जागेचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत पार्किंग व फुटपाथाला लागून व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरुन जाताना त्रास सहन करावा लागत आहे. फुटपाथ वर ठेवलेल्या साहित्यांमधून रस्ता काढत जावे लागत आहेत . तत्कालीन आयुक्त यांच्या काळात येथील सामायिक जागेच्या वापरावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता कारवाईची पाठ फिरताच याठिकाणी पून्हा मार्जिनल जागेचा अमाप वापर करण्यास सुरुवात झालेली आहे.